देशभरातील ’युपीआय’ यंत्रणा कोलमडली   

नवी दिल्ली : देशभरातील ’युपीआय’ यंत्रणा  बुधवारी कोलमडली. त्यामुळे युपीआयवरून पेमेंट करणार्‍या नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.  अनेकांच्या खात्यातून पैसे दोन वेळा वळते (कट) झाले, तर अनेकांना युपीआयद्वारे पेमेंटच करता आलेच नाही. युपीआय सिस्टीम डाऊन झाल्याने ती वापरणारी ’फोन पे’, ’जी पे’, ’पेटीएम’ सारखी ’अ‍ॅप’ही काम करत नाहीत. डाऊनडिटेक्टर डेटाने देखील सायंकाळी सात वाजल्यानंतर युपीआय डाऊन झाल्याचे समाज माध्यमावर म्हटले आहे. सुमारे १३०० हून अधिक लोकांनी त्यांना याबाबत कळविले आहे.  नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाची उपकंपनी असलेल्या एनपीसीआय भीम सर्व्हिसेस लिमिटेडने मंगळवारी भारत इंटरफेस फॉर मनी (भीम) अ‍ॅपची नवीनतम आवृत्ती-भीम ३.० लाँच केली होती, त्याच्या दुसर्‍याच दिवशी हा फटका बसला आहे.
 

Related Articles