भूपेश बघेल यांच्यावर सीबीआयची कारवाई   

निवासस्थानासह ६० ठिकाणी छापे

रांची : महादेव बेटिंग अ‍ॅपशी संबंधित प्रकरणात केंद्रीय गुप्तचर विभागाने (सीबीआय) बुधवारी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगढचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या निवासस्थानासह ६० ठिकाणांवर छापे घातले. छत्तीसगढसह भोपाळ, कोलकाता आणि दिल्लीत सीबीआयने एकाचवेळी कारवाई केली. 
 
या कारवाईवरुन बघेल यांनी भाजपवर जोरदार टीका केली. सीबीआयची कारवाई राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे बघेल यांनी एका पोस्टमध्ये म्हटले आहे. भाजपकडून केंद्रीय संस्थांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी केला जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून सातत्याने केला जातो. छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साय यांनी काँग्रेसचा आरोप फेटाळून लावला. महादेव बेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून तरुणांना सट्टेबाजीचे व्यसन लावले जात आहे. याबाबत सरकारकडे अनेक तक्रारी आल्या असून, आम्ही हे प्रकरण सीबीआयकडे सोपवले आहे. त्यानुसार, सीबीआय कारवाई करत असल्याचे साय यांनी सांगितले.
 
दरम्यान, सीबीआयच्या पथक काल सकाळी बघेल यांच्या रायपूर आणि भिलाई निवासस्थानी दाखल झाले. तसेच, त्यांनी झाडाझडती सुरू केली. यावेळी बघेल यांच्या निवासस्थानाबाहेर कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात होता.
 

Related Articles