मोदी सरकारमुळे गरीब आणखी कंगाल : खर्गे   

नवी दिल्ली : मोदी सरकारमध्ये आर्थिक असमानता आहे. त्यामुळे अरबपती आता करोडपती झाले आणि गरीब कंगाल झाले. अशा परिस्थितीत सरकार ‘सबका साथ सबका विकास’ची घोषणा कशी करू शकते, असा सवाल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली.  
 
खर्गे यांनी समाज-माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, गेल्या ७८ वर्षांपासून कोणत्याही सरकारने सामान्य जनतेला आर्थिकदृष्ट्या इतके कमकुवत केले नाही, जितके मोदी सरकारने केले आहे.आर्थिक असमानता भयंकर आहे. अरबपती करोडपती झाले आणि गरीब कंगाल होत आहेत. ब्रिटिश राजाच्या काळात १८२० मध्ये मध्यम वर्गाच्या उत्पन्नाची जी परिस्थिती होती, तीच परिस्थिती आज झाली आहे. आंतरराष्ट्रीय कामगार संघटना आयएलओच्या  आकडेवारीनुसार, मजुरी वाढीचा दर २००६ मध्ये ९.३ टक्के होता, जो २०२३ मध्ये घटून ०.१ टक्क्यावर आला आहे. महागाई आणि आर्थिक कुंपणामुळे मध्यम वर्ग, गरीब आणि दुर्लक्षित वर्ग संकुचित होत आहे. 

Related Articles