ऐश्वर्या रायच्या मोटारीला अपघात   

मुंबई : अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या मोटारीला अपघात झाला आहे. ऐश्वर्या रायच्या मोटारीला बेस्ट बसने मागून धडक दिली. या अपघातामध्ये कुणीही जखमी झाले नाही, तसेच तिच्या मोटारीचेही कोणतेही नुकसान झाले नाही. 
 
ही घटना बुधवारी दुपारच्या सुमारास घडली. या संबंधी एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जुहूमध्ये एका बेस्ट बसने ऐश्वर्याच्या मोटारीला मागून धडक दिल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. यानंतर ऐश्वर्याचा बॉडीगार्ड मोटारीमधून बाहेर येत, मोटारीची पहाणी करताना दिसत आहे. यात कोणालाही  दुखापत झालेली नसून, तिच्या मोटारीचेही फारसे नुकसान झालेले नाही. अपघात ज्यावेळी घडला त्यावेळी ऐश्वर्या मोटारीमध्ये नव्हती, अशी माहिती समोर आली आहे. 

Related Articles