E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
नदी सुधार प्रकल्पामुळे पानशेत प्रलयाची पुनरावृत्ती?
Samruddhi Dhayagude
27 Mar 2025
समस्याग्रस्त : पुणे
सुरेश मुरलीधर कोडीतकर
मो. नं. ९५४५५२५३७५
पश्चिम घाटाच्या पूर्वेकडील पायथ्याशी पुणे शहर वसलेले आहे. या पश्चिम घाटात मुळा, मुठा, पवना, राम आणि देव या नद्या उगम पावतात. या पाच नद्यांचा संगम होऊन मुळा-मुठा ही एक नदी तयार होते. यासह इंद्रायणी, भामा, घोड आणि कुकडी प्रकल्पातील नद्या मिळून अखेर दौंडजवळ एकत्रित भीमा नदी तयार होते. पुण्याच्या वरील भागात पानशेत, वरसगाव, टेमघर आणि खडकवासला ही धरणं आहेत. ती एकमेकांपासून फार दूर नाहीत. मुळा-मुठा नदीमध्ये पाच पाणलोट क्षेत्रांतून पुण्यात पाणी येते. ही पाणलोट क्षेत्रे डोंगर दर्यांची आणि तीव्र उतारांची आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वेगाने सखल भागाकडे धाव घेऊन ते नाला आणि ओढामार्गे अखेर मुळा-मुठेत येते. राम नदी आणि आंबील ओढ्याला आलेला पूर ही याची उदाहरणे आहेत. सन २०१९ मध्ये आंबील ओढयाला आलेल्या पुराने अनेक संसार उद्ध्वस्त झाले होते. २५ निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले होते. पुणे शहराची भौगोलिक रचना ही बशीसारखी असल्याने मुसळधार पावसाचे पाणी चहूबाजूने वाहून पुण्याकडे धाव घेते आणि कमी वेळात पूरस्थिती निर्माण होते. आता हीच परिस्थिती कायम असताना पुराचे पाणी वाहून नेणार्या मुळा-मुठासाठी सुधार प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्याचे काय दुष्परिणाम होणार आहेत याबाबत साधार विचार प्रस्तुत ठरतो.
मृतप्राय मुळा-मुठा
स्वच्छ, वाहती, समृध्द जीव आणि जैवयुक्त दुर्गंधीमुक्त, सावलीचे काठ असलेली, वाहत्या पाण्याचा एक नाद असलेली, अनेक जीव जलचरांचे आश्रयस्थान, अधिवास असलेली नदी कोणाला आवडणार नाही? अशी मुळा मुठा नदी चार दशकांपूर्वी आपण सर्वांनी अनुभवली आहे. पुणे शहराजवळ मुबलक पाण्याची उपलब्धता असल्याने पुण्याचा चौफेर बेफाम विस्तार झाला आणि तोच शहराच्या, मुळा-मुठेच्या, समग्र पर्यावरणाच्या जीवावर उठला. पुण्यात देशातून आणि महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यातून मोठया प्रमाणावर स्थलांतर झाल्याने लोकसंख्या भूमितीय श्रेणीने आडवीतिडवी वाढली. अनियंत्रित नागरीकरण झाले. नाले, ओढ्यांच्या पात्रांवर अतिक्रमण झाले. नदीचे काठ गिळंकृत करण्याचा सपाटा संगनमताने लावण्यात आला. सांडपाणी आणि औद्योगिक टाकाऊ पाणी मुळा-मुठेत सोडण्यात आले आणि नदीचे गटार झाले. नदीमधील जैववैविध्य आणि परिसंस्था नष्ट झाली. मुळा-मुठे नदी आता केवळ गाळाने नव्हे; तर पुणेकरांच्या कचरा तिथे टाकण्याने भरली आहे. त्यामुळे तिची नैसर्गिक वहनक्षमता खालावून ती मृतप्राय झाली आहे. आता मुळा-मुठेचे पुनरुज्जीवन करण्याची नितांत आवश्यकता असताना शहरात नदी सुधार प्रकल्पाचे घोडे चौखूर उधळलेले आपण पाहत आहोत.
पात्र अरुंद, सुधार रुंद
मुळा-मुठा सांडपाणी, कचरा, राडारोडा, टाकाऊ वस्तू, औद्योगिक प्रक्रियायुक्त पाणी यामुळे प्रदूषित झाली आहे. या नदीच्या बीओडीची पातळी कमाल झाली आहे. पुणे शहरांतर्गत जुन्या सांडपाणी प्रक्रिया केंद्रांची दुरवस्था होती. आता अधिक क्षमता आणि कार्यक्षमता असणारे तंत्रज्ञान आधारित नवीन सांडपाणी प्रक्रिया केंद्रे उभारण्यात येत आहेत. त्याचा कितपत उपयोग होईल हे येणारा काळ सांगेल; पण प्रगतिधीन नदी सुधार यामुळे काय होऊ शकेल हे सांगण्यासाठी कोणाही भविष्यवेत्त्याची गरज नाही. नदी सुधारमध्ये पात्रात दोन्ही बाजूंना ३० किंवा ४० फूट उंच अशी काँक्रिट किंवा दगडी भिंत बांधून मुळा मुठेला कालव्याचे रूप देण्याचा घाट घातला जात आहे. गरवारे महाविद्यालय, कस्पटे वस्ती, मुंढवा कोल्हापूर पद्धतीचा बंधारा या तीन ठिकाणी नदीला बांध घालून प्रवाह अडवण्याचे नियोजित आहे. नदीच्या दोन्ही बाजूंना बांधण्यात येणार्या भिंती पूररेषांच्या आत असल्यामुळे नदीपात्र अरुंद होऊन प्रवाहाचा मार्ग आक्रसला जाणार आहे. भिंती आणि मूळ नदीकाठ यामधील भाग हा रस्ता, बाग, वाहनतळ, क्रीडांगण आणि विरंगुळा केंद्र, बालोद्यान म्हणून उपयोगात आणणे प्रस्तावित आहे. मूळ नदीची अवस्था दुर्गंधीपूर्ण असताना, आरोग्याला बाधक अशा ठिकाणी अशा प्रयोजनांचे औचित्य काय ? दोन काठांमधील पात्र आणि जागा ही नदीची संपूर्ण मालमत्ता आहे. तिच्यावर कब्जा करण्याचा, अतिक्रमण करण्याचा तुम्हा आम्हाला काय अधिकार ?
पूर पातळी आणि धोका
२५ वर्षात एकदा येणार्या पुरासाठी निळी पूररेषा आणि १०० वर्षात एकदा येणार्या पुरासाठी लाल पूररेषा जलसंपदा विभागाने ठरवलेली असते. मुळा-मुठा नदीपात्रात या पूररेषा निश्चित केलेल्या आणि नेमक्या आहेत का? पूररेषा या नदीपात्र हे अतिक्रमणविरहित आहे आणि नदीची वहनक्षमता पुरेपूर आहे, हे गृहीत धरून ठरवलेली असते. या गृहितकानुसार निळी रेषा ही धरणातून ६० हजार क्यूसेक्स विसर्ग सुरक्षितपणे वाहून न्यायला समर्थ आहे असा याचा अर्थ आहे. तथापि, नदीपात्रात आक्रमणे आणि अतिक्रमणे आहेत. नदीपात्रात गाळ, अडथळे, राडारोडा आहे. त्यामुळे सन २०२४ मध्ये ३५ हजार ५७४ क्युसेक्स विसर्गालाच पाणी पातळीने निळ्या रेषेला स्पर्श केला होता. ही अभूतपूर्व परिस्थिती होती. आता नदी सुधारात संगम पुलाच्या खाली नदीचे पात्र, नाईक बेटाजवळ अरुंद झालेले पात्र, बंडगार्डन ते मुंढवा येथे पात्रात बांधलेल्या उताराच्या दगडी भिंती हे सर्व मुळामुठेला अरुंद जागी कोंबण्याचे प्रकार आहेत. संरक्षण भिंत बांधणे, भराव घालणे, नैसर्गिक काठ उद्ध्वस्त करणे, झाडांची कत्तल करणे यामुळे नदी सुधार कसे होणार आहे, हे कोणी सांगेल का?
...पुन्हा पानशेत प्रलय शक्य?
दि एनर्जी अँड रिसोर्स इन्स्टिट्यूटने सन २०१४ मध्ये राज्य शासनाला महाराष्ट्र स्टेट अडॉप्शन अॅक्शन प्लॅन या नावाने एक अहवाल दिला आहे. त्यात भविष्यात पुण्यात पावसाचे प्रमाण ३७.५ टक्के वाढेल आणि मोठया प्रमाणावर ढगफुटी होईल असा स्पष्ट अंदाज वर्तवलेला आहे. म्हणजे पुण्यात पाऊस वाढणार आहे. पुणे शहरात सर्व दिशांनी पावसाचे पाणी वाहून येणार. पुण्यात आधीच सर्वत्र काँक्रिटचे रस्ते असल्याने पावसाचे पाणी मुरण्यास वाव नाही. त्यामुळे पावसाचे पाणी एकतर तुंबणार वा विविध मार्गे नदीकडे येणार. नदीची वहन जागा अतिक्रमणामुळे कमी झालेली असताना आणि पूर पातळी अतिक्रमणामुळे ५ फूटवर गेली असतांना आणि आता नदी सुधार यामुळे आकुंचन पावलेली असताना हा संभाव्य प्रचंड असा प्रलय पुण्याच्या मध्यवर्ती भागातून कसा काय सुरक्षित वाहणार आहे? नदीपात्राची रुंदी कमी होणे म्हणजे पाण्याच्या वहन लोंढ्याचे व्हॉल्यूम (घनफळ) संकोच होणे. परिणामी पुराचे पाणी आडवे पेठांमध्ये आणि तुंबलेल्या फुगवट्याच्या भागात घुसणार. म्हणजे वाढीव पाऊस, निळ्या पूररेषेला स्पर्श करणार्या वहन क्षमतेच्या ६० टक्के विसर्ग धरणातून जरी सोडला तरी पुण्यात पूर थैमान घालेल अशी शक्यता आहे. पानशेत पुराच्या आठवणी ताज्या असताना हा भविष्यातील प्रलय पुण्याची वाताहत करण्याइतका प्रबळ असेल. नदीचे पाणी तुंबले तर मागे नाले, ओढे यातील घाण तुंबून तिथे दुर्गंधी, रोगराई फैलावण्याचा धोका आहेच.
सुधार हवा विचारसरणीला!
नदी सुधार हे ना नदीचे आरोग्य सुधारणार आहे, ना पुनरुज्जीवन करणार आहे. ना पूर नियंत्रित करणार आहे, ना दोन्ही काठांच्या आजूबाजूचे भूजल पुनर्भरण करणार आहे. ना सजीव अधिवास, परिसंस्था जोपासणार आहे. यातील उद्दिष्ट्य हे केवळ जागा मोकळी वा निर्माण करून विकणे, उपाय नसलेल्या वाहतूक कोंडीसाठी नदीपात्राचा बळी देणे यापुरते मर्यादित आहेत. दुःखाची बाब म्हणजे यावर प्रामाणिक कर भरणार्या पुणेकरांचे रु ४७२७ कोटी खर्ची पडणार आहेत. नदी सुधारमध्ये अस्तित्वातील काही पूल, बंधारे, पदपथ, रस्ते, भिंती, इमारती, आणि घाट पाडून तिथे नव्याने बांधकाम प्रस्तावित आहे. थोडक्यात काय तर पुणेकरांना पर्यावरणाची आणखी हानी, आणखी वाहतूक कोंडी आणि पुराची मगरमिठी भेट म्हणून दिली जाणार आहे. पुण्याचे ढासळते पर्यावरण, वाढते तपमान आणि नदीपात्राचा गळा घोटणे यावरून आपण बेफिकीर आहोत हे दिसून येते; पण त्याची फार मोठी किंमत आपल्याला चुकवावी लागणार आहे. नदीची जैव विविधता नष्ट झाली आहे. नदी आणि नागरिकांचे नाते तुटले आहे. नदीतील नागरी हस्तक्षेप कमी करून नदी जिवंत वाहती करावी लागेल. नदीचा उगम ते नदीपात्रातील सर्व झरे मोकळे करावे लागतील. सांडपाणी प्रक्रिया केंद्रे अत्यंत कार्यक्षम करून नदीत सांडपाणी जाणार नाही, यावर कठोर देखरेख ठेवावी लागेल. नदीला सुधार या नावाखाली सिमेंट, दगड, विटा, काँक्रीट याची नव्हे तर परिसंस्था उभी राहण्याची गरज आहे. सुधाराची गरज असेलच तर ती पुणे शहर व्यवस्थापनाला आणि शासन, प्रशासनाच्या विचारसरणीला. भविष्यात पानशेत प्रलयाची पुनरावृत्ती टाळणे सर्वस्वी यांच्याच हाती आहे.
Related
Articles
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा हटविणार
26 Mar 2025
अमेरिकेची युद्ध व्यूहरचना; ‘सिग्नल’ अॅप किती सुरक्षित?
27 Mar 2025
आयटी प्रकल्प राबविण्याबाबत सरकारशी समन्वय साधून कार्यपद्धती निश्चित करावी
28 Mar 2025
दंतेवाड्यात चकमकीत तीन नक्षलवादी ठार
26 Mar 2025
एका घरकुलाची गोष्ट
31 Mar 2025
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
31 Mar 2025
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा हटविणार
26 Mar 2025
अमेरिकेची युद्ध व्यूहरचना; ‘सिग्नल’ अॅप किती सुरक्षित?
27 Mar 2025
आयटी प्रकल्प राबविण्याबाबत सरकारशी समन्वय साधून कार्यपद्धती निश्चित करावी
28 Mar 2025
दंतेवाड्यात चकमकीत तीन नक्षलवादी ठार
26 Mar 2025
एका घरकुलाची गोष्ट
31 Mar 2025
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
31 Mar 2025
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा हटविणार
26 Mar 2025
अमेरिकेची युद्ध व्यूहरचना; ‘सिग्नल’ अॅप किती सुरक्षित?
27 Mar 2025
आयटी प्रकल्प राबविण्याबाबत सरकारशी समन्वय साधून कार्यपद्धती निश्चित करावी
28 Mar 2025
दंतेवाड्यात चकमकीत तीन नक्षलवादी ठार
26 Mar 2025
एका घरकुलाची गोष्ट
31 Mar 2025
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
31 Mar 2025
डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिमा हटविणार
26 Mar 2025
अमेरिकेची युद्ध व्यूहरचना; ‘सिग्नल’ अॅप किती सुरक्षित?
27 Mar 2025
आयटी प्रकल्प राबविण्याबाबत सरकारशी समन्वय साधून कार्यपद्धती निश्चित करावी
28 Mar 2025
दंतेवाड्यात चकमकीत तीन नक्षलवादी ठार
26 Mar 2025
एका घरकुलाची गोष्ट
31 Mar 2025
बीडमध्ये प्रार्थनास्थळात स्फोट
31 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा
2
खासदारांना भरघोस पगारवाढ
3
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
4
‘फिरकी’ने पटकावला पहिला लोकमान्य करंडक
5
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
6
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)