शेअर बाजार : सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळला   

गुंतवणुकदारांचे ४ लाख कोटी पाण्यात

गेले काही दिवस वर वर जाणाऱ्या शेअर बाजारात आज पुन्हा खळबळ उडाली. बुधवारी (२६ मार्च) सेन्सेक्समध्ये ७०० हून अधिक अंकांची घसरण झाली. सेन्सेक्स ७२९ अंकांनी कोसळून ७७,२८८.५० वर बंद झाला. तर निफ्टीही १८२ अंकांनी घसरून २३,४८६.८५ वर आला. सेन्सेक्स आणि निफ्टी यांच्यासह स्मॉलकॅप आणि मिडकॅप निर्देशांकांतही मोठी घसरण पाहायला मिळाली. स्मॉलकॅप १.४५ अंकांनी तर मिडकॅप निर्देशांकांत ०.६७ अंकांची घसरण झाली.

गुंतवणुकदारांचे ४ लाख कोटी रुपये पाण्यात

शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून मोठी उसळी पाहायला मिळत होती. या काळात अनेकांनी नफावसुली केली. त्यामुळे शेअर बाजारात घसरण पाहायला मिळाली. बीएसईवर लिस्टेड असलेल्या कंपन्यांचे एकूण बाजारमूल्य रुपये ४१५ लाख कोटीवरून कमी होऊन ४११ लाख कोटींवर आले. एकाच दिवसांत गुंतवणुकदारांचे ४ लाख कोटी बुडाले.
 
बाजारातील नफा वसुलीचा परिणाम सर्वाधिक बँकिंग, मीडिया आणि रिअल इस्टेट सेक्टरवर पडला. निफ्टी बँक ०.७७ टक्के, पीएसयू बँक १.१९ टक्के आणि खासगी बँक ०.९० टक्क्यांनी कमी झाले. तर निफ्टी मीडिया निर्देशांक २.४० टक्क्यांनी घसरल्यामुळे तो टॉप लुजरमध्ये गणला गेला. रिअल इस्टेट, आरोग्य सेवा आणि तेल आणि वायू या क्षेत्रात एक टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली.
 

Related Articles