अत्याधुनिक तेजस विमानांसाठी अमेरिकेकडून इंजिनाचा पुरवठा   

नवी दिल्ली : भारतीय बनावटीच्या अत्याधुनिक तेजस एमके १ ए लढाऊ विमानांसाठी अमेरिकेच्या जनरल इलेक्ट्रिकल एरोस्पेस कंपनीकडून इंजिनाचा पुरवठा सुरू झाला आहे. त्या अंतर्गत पहिल्या टप्प्यात ९९ एफ ४०४ आयएन २० इंजिने हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला दिली आहेत.
 
हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडकडून तेजस एमके १ ए विमाने तयार केली जाणार आहेत. त्या विमानांत अमेरिकन बनावटीची इंजिने वापरली जाणार आहेत. संरक्षण मंत्रालयाने २०२१ मध्ये ८३ तेजस एमके १ ए विमानांसाठी ४८ हजार कोटींचा करार हिंदुस्तान एरोनॉटिक्ससोबत केला होता. गेल्या वर्षी मार्चपासून विमानांचा पुरवठा होणे अपेक्षित होते. पण, एकाचा पुरवठा झाला नाही. अमेरिकन बनावटीची इंजिने येताच विमानांचा पुरवठा केला जाणार आहे. इंजिनेच आली नाहीत. त्यामुळे विमानांचा पुरवठा रखडला होता.
 

Related Articles