उपसमितीकडे १,२९३ कोर्टीचे बजेट सादर मिळणार स्थायी समितीच्या बैठकीमध्ये मान्यता   

सोलापूर : महानगरपालिकेच्या चालू आर्थिक वर्षातील एक हजार २९३ कोटी तीस लाखांचे अंदाजपत्रक प्रशासनाकडून स्थायी समितीकडे मान्यतेसाठी सादर केले आहे. त्यावर गुरुवारी उपसमितीमध्ये चर्चा होऊन अंतिम मान्यता दिली जाणार आहे.सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी चालू आर्थिक २०२५-२६ चालू वर्षाचे वार्षिक अंदाजपत्रक तयार केले आहे. १२९३ कोटी ३० लाखांचे बजेट असून यामध्ये ७७३.१६ कोटी महापालिकेचे, ४२३.२३ कोटी शासन अनुदान, ९६.६१ कोटी असे एकूण १२९३ कोटी तीस लाखांचे हे मूळ अंदाजपत्रक आहे. २७ मार्च रोजी होणाऱ्या उपसमिती अर्थासताही समितीकडे शिफारस करून अंतिम मान्यता दिली जाणार आहे. या अंदाजपत्रकमध्ये कोणतीही महसुली कर दरवाढ करण्यात आलेली नाही, मात्र चालू आर्थिक वर्षामध्ये विविध विभागाच्या उत्पन्नातून मोठी तूट दाखवण्यात आले आहे. हैदराबाद रोड आणि सात रस्ता येथील पेट्रोल पंपाच्या माध्यमातून २५ कोटीचे उत्पन्न विविध विभागातून ४० कोटी उत्पन्नामध्ये वाट दाखवण्यात आले आहे. सन १९२५-२६ च्या आर्थिक वर्षात विविध शासन अनुदानातून २४० ते २५० कोटीची मदतीची अपेक्षा ठेवण्यात आली आहे. वार्ड कामे करण्यासाठी ९३ कोटी, विविध योजनेतील महापालिकेचा हिस्सा ४२ कोटी, जागा संपादन करण्यात ताब्यात घेण्यासाठी

असे असेल अंदाजपत्रक 

करामधून १४६.५२ कोटी, महसुली उत्पन्नातून १८.५३ कोटी महापालिकेच्या भूमी मालमत्ता विभागाच्या विविध भाड्यातून १५.५७कोटी, महसुली अनुदान ३४५ कोटी, पाणीपुरवठा जमा ८६ कोटी भांडवली जमा १७ कोटी असे एकूण महापालिकेचे ७७३ कोटी १३ लाख ५६ हजाराचे हे अंदाज यंदाच्या बजेटमध्ये करण्यात आला आहे. वेतन व भत्ते पाणीपुरवठ्यावर २१५ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे.
 

Related Articles