सोलापूर बाजार समितीसाठी माजी सभापती राजशेखर शिवदारे, हसापुरेंचे अर्ज दाखल   

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची प्रक्रिया स्थगितीनंतर पुन्हा सुरू झाली असून दुसऱ्या दिवशी २५० अर्जाची विक्री झाली, तर ११ जणांनी अर्ज दाखल केले. यात माजी सभापती राजशेखर शिवदारे, सुरेश हसापुरे, श्रीशैल पाटील यांचा समावेश आहे.
 
दि. ७ ऑक्टोबर २०२४ मध्ये कृषी उत्पन्न बाजार समिची निवडणूक लागली होती. प्रक्रियेच्या पहिल्या दिवशी १८१ अर्जाची विक्री झाली होती; मात्र पहिल्या दिवशी एकाही उमेदवारांनी अर्ज दाखल केले नव्हते. त्याच दिवशी निवडणुकीस स्थगिती आल्यानंतर निवडणूक लांबणीवर गेली होती. आता पुन्हा तेथूनच निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून, दुसऱ्या दिवशी अकरा जणांनी अर्ज दाखल केले.

अर्ज दाखल केलेले उमेदवार 

सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातून सुरेश हसापुरे, शिवानंद बगले-पाटील, राजशेखर सगरे, राजशेखर शिवदारे, वसंत पाटील, सुरेश कराळे, श्रीशैल पाटील यांचे अर्ज दाखल. सहकारी संस्था महिला राखीव मतदारसंघातून माहेश्वरी बिराजदार, सहकारी संस्था इतर मागासवर्ग मतदारसंघातून सुरेश हसापुरे, सहकारी संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघातून प्रथमेश पाटील, हमाल, तोलाई मतदारसंघातून गफ्फार चांदा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
 

Related Articles