सोलापूर जिल्हा दूध संघ प्रशासक नियुक्तीस स्थगिती !   

सोलापूर : पुणे विभागीय उपनिबंधक सहकारी संस्थेने जिल्हा दूध संघावरील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकांची नियुक्ती केली होती. त्या प्रशासकाच्या नियुक्तीला मुंबई येथील सहनिबंधक संस्थेने तात्पुरती स्थगिती दिली आहे.
 
जिल्हा दूध संघ तोट्यात असल्याने पुणे विभागीय उपनिबंधक सहकारी संस्थेने दूध संघावरील संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासक नियुक्त केले होते. मात्र, या निर्णयाच्या विरोधात संचालकांनी मुंबई येथील सहनिबंधक संस्थेकडे अपील केले. त्याला स्थगिती देण्यात आली आहे.

Related Articles