प्रशांत कोरटकरला पोलिस कोठडी   

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना धमकी देणार्‍या पत्रकार प्रशांत कोरटकर याला येथील सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 
 
कोरटकर याला कोल्हापूर पोलिसांनी सोमवारी तेलंगणातून अटक केली होती. त्याला काल न्यायालयासमोर हजर केले होते. यावेळी न्यायालयाने कोरटकर याला २८ मार्चपर्यंत कोठडी सुनावली. कोरटकर २५ फेब्रुवारीपासून फरारी होता. कोरटकरविरोधात कोल्हापूरसह नागपूर व जालना येथे गुन्हे दाखल झाले आहेत.
 
१८ मार्च रोजी कोल्हापुरातील अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.व्ही. कश्यप यांनी कोरटकरचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. मात्र, यानंतरही तो पोलिसांना शरण आला नव्हता. दुसरीकडे, कोल्हापूर पोलिस त्याच्या मागावर होते. चार दिवसांपूर्वी कोल्हापूर पोलिसांनी चंद्रपुरात छापा घातला होता. मात्र, त्याआधीच तो तिथून निसटला होता. इंद्रजीत सावंत यांनी ‘छावा’ चित्रपटावर आपली भूमिका मांडली होती. 

Related Articles