श्रीलंकेच्या तीन माजी लष्करी अधिकार्‍यांवर ब्रिटनचे निर्बंध   

मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा ठपका

कोलांबो : ब्रिटनने श्रीलंकेच्या तीन माजी लष्करी अधिकारी आणि  लिबरेशन ऑफ तामिळ टायगर (लिट्टे) दहशतवादी संघटनेचा उप प्रमुखांवर ब्रिटनने निर्बंध लागू केले आहेत. लिट्टेविरोधातील कारवाईवेळी मानवी हक्कांचे उल्लंघन केल्याचा ठपका चौघांवर ठेवला आहे. 
 
ब्रिटनच्या परराष्ट्र कार्यालयाने सोमवारी याबाबतची घोषणा केली. माजी लष्करप्रमुख, जनरल शिवेंद्र सिल्वा, माजी नौदल प्रमुख वसंथा करन्नागौडा, लष्कराचे माजी अधिकारी जगथ जयसूर्या यांच्यावर निर्बंध लागू केले आहेत त्या अंतर्गत त्यांना ब्रिटनमध्ये प्रवेशास मनाई केली असून त्यांची मालमत्ता जप्त केली आहे. त्याशिवाय लिट्टेचा उप प्रमुख विनयगमूर्ती मुरलीधरन याच्यावर निर्बंध लागू केले आहेत. त्याने लिट्टेपासून फारकत घेतली होती. नंतर तो सरकारमध्ये मंत्री देखील बनला होता. या चौघांवर मानवी हक्कांचे उल्लंघन केलयाचा आराप ठेवला असून श्रीलंकेच्या यादवी युद्धात अनेकांची हत्या, छळ तसेच लैंगिक छळ केल्याचे आरोप ठेवले आहेत. त्यांच्यावरील आरोप गंभीर आहेत त्यामुळे त्यांना जबाबदार ठरवत निर्बंध लागू केले जात आहेत, असे राष्ट्रकुल आणि विकास व्यवहार विभागाचे परराष्ट्र सचिव डेव्हीड लॅमे यांनी सांगितले. ब्रिटनचे सरकार श्रीलंकेच्या सरकारसोबत कार्य करत असून मानवी हक्कांत सुधारणा व्हावी, यासाठी प्रयत्नशील असल्याचेही ते म्हणाले.
 

Related Articles