युक्रेन युद्धातून वाचलेल्या पाच सिंहांचे पुनर्वसन   

लंडन : रशिया आणि युक्रेन युद्धाची झळ युक्रेनमधील वन्य प्राणी आणि पक्ष्यांनाही बसली आहे. युद्धातून बचावलेल्या पाच सिंहाचे पुनर्वसन ब्रिटनमध्ये करण्यात आले आहे. इंग्लंड येथील प्राणी संग्रहालयात त्यांचे पुनर्वसन केले आहे. युद्धभूमीवरुन त्यांची नुकतीच सुटका केली होती. त्यात एक आफ्रिकन सिंह रोरी, अमिना, लिरा आणि वंदा यांना या महिन्यात १२ तासांचा प्रवास करुन प्रथम बेल्जियम येथे नंतर इंग्लंड येथे आणले, यानंतर सिंहीण युनाला ऑगस्टमध्ये आणले. एक सिंहीण जखमी आहे. पायाला जखम झाल्यामुळे तिला चालता येत नाही. पाचही सिंह युक्रेनच्या सीमेवर होते. त्यांना बेकायदा आणले होते. एक व्यक्ती त्यांचे पालनपोषण करत होती. रशियाने हल्ला केल्यानंतर सिंहांना त्याने  वार्‍यावर सोडले होते. अखेर त्यांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची युद्धभूमीवरून सुटका करुन ब्रिटनमध्ये आणले आहे. 
 

Related Articles