ऑस्कर विजेत्या लघुपटाच्या दिग्दर्शकाला घेतले ताब्यात   

जेरूसालेम : ऑस्कर पुरस्कार विजेत्या नो अदर लँड लघुपटाचे सह दिग्दर्शक बसेल आद्रा यांच्यावर इस्रायलच्या सैनिकांनी हल्ला केला असून त्यांना ताब्यात घेतल्याची माहिती त्यांचे सहकारी व दिग्दर्शक आणि आणखी एकाने दिली. 
 
वेस्ट बँकच्या सुसीया येथे निर्वासितांची छावणी आहे. त्या छावणीत त्यांनी आश्रय घेतला होता. तेथे इस्रायलच्या सैनिकांनी सोमवारी हल्ला केला होता.  तेव्हा तिघांना ताब्यात घेतले. त्यात बसेल आद्रा, चित्रपट निर्माते हमदान बल्लाळ यांचा समावेश होता, अशी माहिती त्यांच्या  वकील ली त्सेमेल यांनी दिली. लष्करी तळावर वैद्यकीय उपचारासाठी तिघांना ताब्यात घेतल्याचे पोलिसांनी त्यांना सांगितले. पण, त्या मंगळवारी सकाळी तेथे ते पोेचल्या नाहीत. त्यामुळे अधिक माहिती मिळालेली नाही. 
 
सह दिग्दर्शक  बसेल आद्रा आणि सुमारे १२ पेक्षा अधिक निर्वासितांना लष्कराने ताब्यात घेतले. उपस्थित नागरिकांनी सांगितले की,  मास्कधारी आणि शस्त्रधारी लष्करी पोषाखातील इस्रायली सैनिकांनी गावावर हल्ला केला. त्यांनी आमच्यावर बंदुका रोखल्या होत्या. तेव्हा निर्वासित नागरिकांनी सैनिकांच्या दिशेने दगडफेक केली. आद्रा यांनी सांगितले की, ऑस्कर सोहळ्याहून परतल्यानंतर आमच्यावर सातत्याने हल्ले केले जात आहेत. चित्रपटाला पुरस्कार मिळाल्याचा एक प्रकारे बदला घेतला जात आहे. हा प्रकार एक प्रकारची शिक्षाच वाटते. इस्रायलच्या लष्कराने सांगितले की, सैन्यावर दगडफेक करणार्‍या तीन संशयित पॅलेस्टिनी नागरिकांना आम्ही ताब्यात घेतले आहे. त्यात एका इस्रायली नागरिकाचा समावेश आहे. तो इस्रायल आणि पॅलेस्टिनमध्ये हिंसक कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न करत होता.  

‘नो अदर लँड’ची कहाणी

नो अदर लँड लघुपट आहे. तो २०२४ मध्ये ऑस्कर चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट लघुपट ठरला आहे. लघुपटात मसाफेर यत्ता परिसरातील घटनांचा मागोवा घेतला आहे. गाव उद्ध्वस्त करण्यासाठी आलेल्या इस्रायली सैनिकांना रहिवासी रोखत असल्याचे दाखविले आहे. बल्लाळ आणि आद्रा दोघेही मसाफेर यत्ता गावचे रहिवासी आहे.  त्यांनी   इस्रायलचे दिग्दर्शन युवल अब्राहम आणि राहेल सोझोर यांच्यासमवेत तो तयार केला होता. त्यामुळे लघुपट इस्रायल आणि पॅलेस्टिनची संयुक्त निर्मिती आहे.
 

Related Articles