जम्मू - काश्मीरमधून फुटीरतावादी हद्दपार : शहा   

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केंद्रात भाजपचे खंबीर सरकार आले आहे. त्यामुळे जम्मू आणि काश्मीरमधून फुटीरवादी हद्दपार झाले आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी सांगितले.
 
जम्मू आणि काश्मीरमधील हुरियत कॉन्फरन्सच्या दोन गटांनी फुटीरवादी हुरियत कॉन्फरन्सपासून नाते तोडत असल्याची घोषणा केली आहे. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत शहा यांनी केलेे. गटांचा निर्णय भारताच्या ऐक्यासाठी महत्त्वाचा असल्याचे ते म्हणाले. मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमुळे फुटीरवाद्यांवर वचक बसला आहे. फुटीरवादी  हद्दपार झाले आहेत. हुरियत कॉन्फरन्सपासून वेगळे होत असलेल्या गटांचा आदर्श अन्य फुटीररवादी संघटनांनी घ्यावा, त्यांनी देशाच्या प्रमुख प्रवाहात यावे, असे आवाहन त्यांनी एक्सवर केले. अशा प्रकारच्या निर्णयामुळे भारताच्या ऐक्याला चालना आणि फुटीरवादी चळवळींना कायमची मूठमाती मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शहा म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दूरदृष्टी, विकास, शांतता आणि भारताच्या ऐक्याचा विजय झाला आहे. दरम्यान, हुरियत कॉन्फरन्स फुटीरवादी संघटना आहे. देशविरोधी, फुटीरवादी कारवाया करत असल्याने संघटनेवर सरकारने यापूर्वीच बंदी घातली आहे. 
 

Related Articles