करेंगे दंगे चारो ओर...   

कुणाल कामरा याचे नवीन गाणे

शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना गाण्यामधून डिवचले

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन, विडंबनकार कुणाल कामराने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त गाणे गायल्याने पुन्हा तो वादात सापडला आहे. या गाण्यामधून त्यांने शिंदे गटाच्या शिवसैनिकांना लक्ष्य केले आहे. भारताचे आणखी एक राष्ट्रगीत म्हणत कुणाल कामराने आणखी गाणे गायले आहे. करेंगे दंगे चारों ओर पुलिस के पंगे चारों ओर. एक दिन मन में नथूराम, हरकतें आसाराम. हम होंगे कंगाल एक दिन, असे गाणेे कुणाल कामराने गायल आहे.
खार येथील एका क्लबमध्ये कामराने ठाणे की रिक्षा असे विडंबनात्मक गाणं गाऊन उपमुख्यमंत्री शिंदेंवर टीका केली होती. हे गाणे समोर आल्यानंतर संतप्त शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी क्लबची तोडफोड केली. 
 
कामराने पुन्हा शिंदेंच्या शिवसैनिकांना डिवचले आहे. कामराने आणखी एक गाण्याचा व्हिडीओ पोस्ट करुन क्लबमधल्या तोडफोडीवर भाष्य केले आहे.
शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी खार येथील युनिकॉन्टिनेंटल हॉटेलमधील द हॅबिटॅट क्लबची तोडफोड केली होती.

माफी मागण्यास नकार

दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या टीकेबद्दल माफी मागणार नसल्याचे कुणाल कामराने म्हटले आहे. कुणाल कामराने सोमवारी एक पोस्ट करून कॉमेडी शोचे रेकॉर्डिंग झालेल्या क्लबच्या तोडफोडीवरुन टीका केली होती.
 

Related Articles