अजय सेठ अर्थ खात्याचे सचिव   

नवी दिल्ली : कर्नाटक केडरचे १९८७ च्या बॅचचे आयएएस अधिकारी अजय सेठ यांची अर्थ मंत्रालयाचे नवे अर्थ सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. अजय हे माजी अर्थ सचिव तुहिन कांत पांडे यांची जागा घेतील. कार्मिक मंत्रालयाने अजय सेठ यांच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.  अजय हे आर्थिक व्यवहार विभागात सचिव म्हणून काम करत होते. ते एक अनुभवी प्रशासक आहेत. त्यांना अर्थ, सार्वजनिक धोरण आणि प्रशासनातील चांगला अनुभव आहे. 

Related Articles