सुरेंद्र कोलीच्या सुटकेला आव्हान अर्जावर ३ एप्रिल रोजी सुनावणी   

सुरेंद्र कोलीच्या सुटकेला आव्हान अर्जावर ३ एप्रिल रोजी सुनावणी

नवी दिल्ली : बहुचर्चित निठारी हत्याकांडातील आरोपी सुरेंद्र कोली याच्या निर्दोष सुटकेला आव्हान दिलेल्या अर्जावर सर्वोच्च न्यायालय ३ एप्रिल रोजी सुनावणी घेणार आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाने १६ ऑक्टोबर २०२३ रोजी कोली याला दोषमुक्त केले होते. या आदेशाला केंद्रीय गुप्तचर विभाग (सीबीआय) आणि उत्तर प्रदेश सरकारने आव्हान दिले होते. या अर्जावर सुनावणी घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने मागच्या वर्षी दर्शविली होती. न्यायमूर्ती बी.आर. गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टीन जॉर्ज मसिह यांच्या खंडपीठापुढे काल हा अर्ज सुनावणीसाठी होता. या प्रकरणाची सुनावणी पुढील आठवड्यात घेण्यात यावी, अशी मागणी वकिलाने केली. न्यायालयाने ती मागणी मान्य करत ३ एप्रिल रोजी सुनावणी होईल, असे स्पष्ट केले.

Related Articles