उन्नाव प्रकरण पीडितेची सुरक्षा कायम राहणार   

नवी दिल्ली : उन्नाव प्रकरणातील पीडितेला देण्यात आलेली राज्य राखीव पोलिस दलाची (सीआरपीएफ) सुरक्षा काढून घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी नकार दिला. तसेच, पीडितेला अद्याप धोका असल्याची साशंकतादेखील व्यक्त केली. पण, पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांची आणि इतर साक्षीदारांची सीआरपीएफ सुरक्षा न्यायालयाने काढून घेतली. 
 
न्यायमूर्ती बेला एम. त्रिवेदी आणि पी न्यायमूर्ती. बी वराळे यांच्या खंडपीठासमोर हा अर्ज सुनावणीस होता. या प्रकरणाचा निकाल लागला आहे. दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे. मात्र, पुढील आदेशापर्यंत पीडितेची सुरक्षा कायम राहील, असे खंडपीठाने यावेळी स्पष्ट केले. पीडितेच्या कुटुंबातील सदस्यांना आणि साक्षीदारांना अजूनही धोका वाटत असल्यास त्यांनी स्थानिक पोलिसांशी संपर्क साधावा, असेही न्यायालयाने सांगितले.अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भाटी यांनी या प्रकरणातील दोषींना शिक्षा झाली आहे. त्यामुळे सीआरपीएफ सुरक्षा कवच काढून घेण्याबाबत परवानगी मागितली. १ ऑगस्ट २०१९ रोजी न्यायालयाच्या आदेशानंतर केंद्राने पीडितेसह कुटुंबीयांना आणि साक्षीदारांना सीआरपीएफ सुरक्षा प्रदान केली होती. २०१७ मध्ये उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. या प्रकरणात भाजप नेते कुलदीप सिंह सेंगर यांना जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. 
 

Related Articles