पानिपतमध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा व स्मारक उभारणार   

मुंबई, (प्रतिनिधी) : मराठ्यांच्या  शौर्याचे प्रतीक म्हणून पानिपत येथील कालाआंब परिसरात एक स्मारक उभारण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत दिली. पानिपत ही आमच्या पराभवाची नाही, तर मराठ्यांच्या शौर्याची लढाई आहे. पानिपतच्या लढाईत त्या दिवशी पराभव झाल्याचे शल्य मनात असेल; पण तिथे आमचा पराभव झाला, असे आम्ही मानत नाही. पानिपतमधून उर्जा घेऊनच महादजी शिंदे यांनी नंतर दिल्ली जिंकली, छत्रपती शिवाजी महाराजांचा भगवा देशात लावला. या देशाकरिता मराठे लढले म्हणूनच आमच्या शौर्याचे स्मारक तेथे तयार झाले पाहिजे, असेही  फडणवीस म्हणाले.

Related Articles