कुणाल कामरा याला समन्स   

मुंबई : स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी समन्स बजावले आहे. मात्र, कामरा याने एक आठवड्याची मुदत मागितली आहे.कामरा याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर एक विडंबनात्मक गाणे म्हटले आहे. त्यावरुन, राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. कामरा यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरे यांसह महाविकास आघाडीचे नेते सरसावले आहेत. दुसरीकडे, कामरा याच्यावर कारवाई करण्यासाठी महायुतीचे नेते आक्रमक झाले आहेत.
 
मुंबई पोलिसांनी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे कामरा याला समन्स बजावताना काल सकाळी ११ वाजता चौकशीस हजर राहण्यास सांगितले होते. कामरा याने सोमवारी रात्री उशिरा चार पानी पोस्ट करत माफी मागणार नाही, असे म्हटले होते. तसेच, पोलिसांना सहकार्य करेन, असेही म्हटले होते. कामराविरोधात विविध कलमांखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कामरा याने शिंदे यांचा गद्दार असा उल्लेख केला होता. कामराने ज्या ठिकाणी हा कार्यक्रम सादर केला होता; त्या स्टुडिओची शिंदे यांच्या शिवसैनिकांनी तोडफोड केली होती. 

Related Articles