दिशा सालियनच्या वडिलांची पोलिसांत तक्रार   

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यू प्रकरणात दिशाच्या वडिलांनी पोलिस सहआयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांसह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.या प्रकरणाची फेरचौकशी करण्यात यावी, अशा मागणीचा अर्ज दिशाचे वडील सतीश सालियन यांनी नुकताच मुंबई उच्च न्यायालयात दाखल केला होता. त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले होते.
 
सतीश सालियन यांचे वकील नीलेश ओझा यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्ही पोलिस आयुक्तालय कार्यालयात लेखी तक्रार (एफआयआर) दाखल केली असून गुन्हे शाखेने ती स्वीकारली आहे. यामध्ये आदित्य ठाकरे, दिनो मोरिया,  रिया चक्रवर्ती, सूरज पांचोली आदींचा समावेश आहे. यासोबतच, अन्यही काही पोलिस अधिकार्‍यांची नावे आहेत. ही तक्रार एफआयआर म्हणून नोंदवावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. 
 
यासोबतच, मालवणी पोलिस स्टेशनशी संबंधित कोणताही अधिकारी किंवा पोलिस आयुक्त दर्जाचा अधिकार तपास करू शकत नाही, या प्रकरणाचा तपास केंद्रीय गुप्तचर विभागाकडे (सीबीआय) सोपवण्याची मागणी तक्रारीत करण्यात आली आहे.
 

Related Articles