मुंबई : मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीची घोडदौड मंगळवारी सलग सातव्या दिवशी सुरु होती. निर्देशांकांत किंचित वाढ झाली. सेन्सेक्स ३२ ने वाढून तो ७८ हजारावर पोचला. परदेशी गुंतवणुकीचा ओघ वाढल्याने आणि सकारात्मक वातावरणामुळे अनेक कंपन्यांच्या समभागांचे मूल्य वाढले. त्यामुळे गुंवणूकदारांचा नफा देखील झाला. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स ३२.८१ ने वाढून तो ७८ हजार १७.१९ वर बंद झाला. सोमवारच्या तुलनेत काल किंचित वाढ झाली. दिवसभरात एका क्षणी तो ७५१.३१ ने वाढून त्याने ७८ हजार ७४१.६९ पर्यंत झेप घेतली. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०.३० ने वाढून ते २३ हजार ६६८.६५ वर बंद झाला. अल्ट्रा टेक सिमेंट, इन्फोसिस, बजाज फिनसर्व्ह, अॅक्सिस बँक, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल, एचसीएल टेक आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस यांच्या समभागांचे मूल्य मोठे वाढले. झोमॅटो, इंडईंड बँक, अदानी पोर्टस, महिंद्रा अँड महिंद्रा, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि सन फार्माचे समभाग घसरले.
Fans
Followers