राजगुरुनगरवासीयांकडून पंजाबमध्ये शहिदांना अभिवादन   

राजगुरुनगर, (वार्ताहर) : शहीद दिनानिमित्त राजगुरुनगर येथुन क्रांतितीर्थ यात्रेसाठी गेलेल्या तीस राजगुरुनगरकर देशभक्तांनी हुतात्मा राजगुरु, भगतसिंग, सुखदेव यांना त्यांच्या राष्ट्रीय समाधीस्थळ असलेल्या हुसैनिवाला बॉर्डर, फिरोजपूर (पंजाब) येथे अभिवादन केले. शहीद दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या क्रांतितीर्थ यात्रेच्या माध्यमातून तीस देशभक्त महिला-पुरुष हुतात्मा राजगुरु जन्मस्थळ येथे अभिवादन करून तेथील जल व माती घेऊन अभिवादन करण्यासाठी पंजाब येथे गेले होते. यावेळी फिरोजपूरच्या जिल्हाधिकारी दीपक्षिका शर्मा, अतिरिक्त उपायुक्त डॉ. निधी कुमुद बांबा, प्रांताधिकारी दिव्या पी व तहसीलदार राजविंदर कौर यांनी सर्व राजगुरुनगरकर देशभक्तांचे स्वागत केले. 
 
राष्ट्रीय स्मारक हुसैनिवाला बॉर्डर (फिरोजपर, पंजाब) येथे शहीद दिनानिमित्त समाधी स्थळावर हे जल व माती पंजाब राज्याचे कृषीमंत्री गुरमीत सिंह खुड्डीया व महिला व बालविकास मंत्री डॉ. बलजीत कौर, खासदार शेरसिंग घुबाया यांच्या तसेच राजगुरुनगरकर देशभक्तांच्या हस्ते समर्पित करण्यात आले. 
यानंतर शहीद भगतसिंग यांचे जन्मस्थळ असलेल्या खटखटकलान येथे तसेच शहीद सुखदेव यांचे जन्मस्थळ असलेल्या नौघरा, लुधियाना येथे राजगुरुनगरकर देशभक्तांनी नतमस्तक होऊन अभिवादन केले. यावेळी शहीद सुखदेव यांचे वंशज अशोक थापर यांनी देशभक्तांचे स्वागत केले. 
 
क्रांतितीर्थ यात्रेचे आयोजन हुतात्मा राजगुरु भक्त निलेश आंधळे, मधुकर गिलबिले, अमर टाटीया, गणेश देव्हरकर यांनी केले. यात्रेमध्ये दीप्ती आंधळे, बाबाजी कौटकर, काजल टाटीया, धीरज कटारिया, प्रियांका दिघे, मीरा शिंदे, अभिनाथ शेंडे, भावना शेंडे, मनीषा पवळे, संगीता तनपुरे, शंकर गवारी, रोहिणी गवारी, विकी खैरनार, बाळासाहेब खामकर, आप्पा पवार, उषा पवार, संतोष सुतार, किरण काळे, रोहित वाळके, नितीन सैद, नंदकिशोर देव्हरकर हे सहभागी झाले होते.
 

Related Articles