देसाई साखर कारखान्यास भीषण आग   

रेकार्ड रूम, शेती कार्यालय जळाले; ३५ लाखांचे नुकसान

सातारा, (प्रतिनिधी) : पाटण तालुक्यातील मरळी (दौलतनगर) येथील लोकनेते बाळासाहेब देसाई सहकारी साखर कारखान्यास रात्री साडेनऊच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीत कारखान्याची रेकॉर्ड रूम आणि शेती ऑफिस पूर्णपणे जळाले आहे. या आगीत ३५ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आगीचे कारण समजू शकलेले नाही.
 
मल्हारपेठचे सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले आणि महिला पोलीस उपनिरीक्षक एस. बी. शेळके    पोलीस फौजफाट्यासह दिवसभर आगीच्या कारणाचा शोध घेत होते. कारखान्याच्या गव्हाणवाडी बाजूकडून अचानक आग लागली. आग लागल्याचे रात्री कामावर असलेल्या सुरक्षारक्षकांना समजताच, त्यांनी तिकडे धाव घेतली. तोपर्यंत आगीने रौद्र रूप धारण केले होते. 
 

Related Articles