शबरी आदिवासी अर्थ व विकास महामंडळातर्फे व्यवसायासाठी कर्ज योजना   

पुणे : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळा अंतर्गत केंद्र सरकारच्या एनएसटीएफडीसी नवी दिल्ली पुरस्कृत तसेच राज्य शासन पुरस्कृत योजनेंतर्गत आदिवासी सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींना व्यवसायासाठी अल्प दराने कर्ज उपलब्ध करून देण्यात येत असून, ७ एप्रिलपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
या योजनेंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय निहाय घोडेगाव, राजूर, सोलापूर व छत्रपती संभाजीनगर या कार्यालयांना राज्य शासनाचा १६ व केंद्र सरकारचा ३९ लक्षांक प्राप्त झालेला आहे. या योजनेचा लाभ शबरी शाखा कार्यालय, जुन्नर कार्यक्षेत्रातील पुणे, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, धाराशीव, बीड, लातूर या जिल्ह्यातील लाभार्थ्यांना दिला जाणार आहे.
 
या योजनेंतर्गत स्वंयसहायत्ता बचत गटांना पाच लाख रुपयांचे व्यवसाय कर्ज, ऑटो वर्कशॉप किंवा स्पेअर पार्ट व्यवसायासाठी पाच लाख रुपये, लहान उद्योग व्यवसायासाठी दोन लाख रुपये, ऑटो रिक्षा किंवा माल वाहू रिक्षासाठी तीन लाख रुपये, वाहन व्यवसायासाठी १० लाखापासून १५ लाखापर्यंत व्यवसाय कर्ज अल्प दरात देण्यात येते. या कर्ज योजनेत कोणत्याही प्रकारचे अनुदान नाही.
 
योजनेचे अर्ज https://mahashabari.in या संकेतस्थळावर भरावयाचे आहेत. अधिक माहितीसाठी हे संकेतस्थळ तसेच महामंडळाचे जुन्नर शाखा कार्यालय येथे संपर्क साधावा.

Related Articles