श्रेयसच्या अर्धशतकामुळे पंजाबचा विजय   

अहमदाबाद : आयपीएलच्या १८ व्या हंगामातील गुजरात टायटन्स विरुद्ध पंजाब किंग्ज यांच्यातील पाचवा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानावर मंगळवारी खेळवण्यात आला. या सामन्यात श्रेयस अय्यर याने नाबाद ९७ धावा केल्या. त्याच्या या झंझावाती अर्धशतकी कामगिरीमुळे पंजाबला ११ धावांनी विजय मिळविता आला. 
 
पंजाबच्या संघाने २४३ धावा केल्या होत्या. त्यामुळे गुजरातला २४४ धावांचे आव्हान मिळाले होते. मात्र हे आव्हान गुजरातला पार करता आले नाही. या सामन्यातून आयपीएलमध्ये पदार्पण केलेला पंजाब संघाचा प्रियांश आर्या याने २३ चेंडूत ४७ धावा केल्या. तर त्याला साथ देण्यासाठी आलेला प्रभासिमरन हा ५ धावांवर बाद झाला. मॅक्सवेल मात्र शून्यावर बाद झाला. स्टॉयनिस याने २० धावा केल्या. तर शशांक सिंग ४४ धावांवर नाबाद राहिला. तसेच अवांतर १४ धावा संघाला मिळाल्या. तसेच पंजाबच्या गोलंदाजांनी मात्र जबरदस्त गोलंदाजीचा नजराणा पेश केला. या सामन्यात पंजाबच्या गोलंदाजांनी गुजरातच्या फलंदाजांना झटपट बाद केले. यामध्ये पंजाबचा गोलंदाज अर्शदीप सिंग याने २ महत्त्वपुर्ण फलंदाज टिपले. अर्शदीप याने ४ षटके टाकली आणि फक्त ३६ धावा दिल्या. तर मॅक्सवेल याने १ फलंदाज बाद केला. मॅक्रो जॅनसेन याने १ फलंदाज तंबूत माघारी पाठविला. पंजाब किंग्जच्या संघाने या सामन्यात युवा क्रिकेटपटू प्रियांश आर्याला पदार्पणाची संधी दिली. मेगा लिलावात या खेळाडूला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी पंजाब आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात चांगलीच सुरस रंगली होती. शेवटी पंजाबच्या संघाने बाजी मारली होती. प्रियांश आर्या याचा जन्म १८ जानेवारी २००१ मध्ये  झाला. २३ वर्षीय प्रियांश डावखुर्‍या हाताने स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. याशिवाय उजव्या हाताने तो गोलंदाजीही करू शकतो. तो १९ वर्षीय भारतीय संघाकडूनही खेळला आहे. 
 
दिल्ली प्रीमियर लीग स्पर्धेत ६ चेंडूत ६ षटकार मारून त्याने लक्षवेधून घेतले होते.  यंदाच्या हंगामात पदार्पणाची संधी मिळाल्यावर त्याने आपल्या भात्यातील धमाकाही दाखवून दिला. आयपीएलच्या मेगा लिलावात अनेक युवा खेळाडूंवर मोठी बोली लागली. यातीलच तोही एक लक्षवेधी चेहरा आहे. एका षटकात ६ षटकार मारत युवराज सिंग आणि रवी शास्त्री यांच्या खास पक्तींत बसलेल्या या युवा खेळाडूसाठी  पंजाबच्या संघानें आपल्या ताफ्यात घेतले.  आयपीएलमधील पदार्पणाच्या सामन्यात पहिल्या षटकापासूनच प्रियांशचेे अर्धशतक अवघ्या ३ धावांनी हुकले. राशिद खानच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. २३ चेंडूत त्याने ७ चौकार आणि  २ षटकाराच्या मदतीने ४७ धावा केल्या. 
 
संक्षिप्त धावफलक पंजाब : श्रेयस अय्यर नाबाद ९७, प्रियांश आर्या ४७,प्रभासिमरन ५, अझमतुल्ला १६, मॅक्सवेल ०, स्टॉयनिस २०, शशांक सिंग नाबाद ४४, अवांतर १४ एकूण २० षटकांत २४३/५  गुजरात : साई सुदर्शन ७४, गिल ३३, बटलर ५४, रुदरफोर्ड ४६, तेवतिया ६, शाहरुख खान ६, एकूण २० षटकांत २३२/५ 

Related Articles