भारतीय पंच नितीन मेनन, जयराम मदन गोपाळ यांचा आयसीसीकडून सन्मान   

मुंबई : क्रिकेटमध्ये पंच म्हणून चांगली कामगिरी करणारे भारतीय पंच नितीन मेनन यांना आयसीसीने मंगळवारी महत्त्वपुर्ण पंचांच्या यादीत समाविष्ट करून घेतले आहे. तर जयराम मदन गोपाळ यांना आयसीसीकडून सर्वोत्तम कामगिरी बद्दल बढती मिळाली आहे.यांच्याबरोबर दक्षिण आफ्रिकेचे अल्लाहुद्द्दीन पालेकर आणि इंग्लंडचे पंच अ‍ॅलेक्स व्हारफ यांना देखील आयसीसीने एलिट पॅनेलमध्ये सहभागी करून घेतले आहे. असा बहुमान मिळविणारे नीतीन मेनन हे एकमेव भारतीय पंच आहेत. 
 
मायकल गॉफ आणि जोएल वेलसन यांनी या नवोदित पंचांसाठी भविष्यातील कामगिरीसाठी नवी दारे उघडली आहेत. तसेच ५० वर्षांचे असणारे मदन गोपाळ हे महत्त्वपुर्ण कसोटी आणि एकदिवसाच्या सामन्यांसाठी पंच म्हणून जबाबदारी पार पाडणार आहेत. तामिळनाडूचे असणारे मदन गोपाळ यांनी १ कसोटी, २२ एकदिवसाचे सामने आणि ४२ टी-२० सामने खेळले आहेत. 
 

Related Articles