हरमनप्रीत कौर, दीप्ती शर्मा, स्मृती मानधना ’अ’ श्रेणीत   

नवी दिल्ली: भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, उपकर्णधार स्मृती मानधना आणि अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा यांना बीसीसीआयने सोमवारी जाहीर केलेल्या केंद्रीय कराराच्या ’अ’ श्रेणीत कायम ठेवले आहे. ’अ’ श्रेणीतील खेळाडूंना वर्षाला ५० लाख, ’ब’ गटासाठी ३० लाख आणि ’क’ गटासाठी १० लाख रुपये दिले जातात.
 
वेगवान गोलंदाज रेणुका ठाकूर, अष्टपैलू जेमिमा रॉड्रिग्ज, यष्टिरक्षक रिचा घोष, सलामीची फलंदाज शेफाली वर्मा यांचा ’ब’ गटात समावेश आहे. मागच्या वर्षी ’ब’ गटात असलेली डावखुरी फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड हिला मात्र करारातून वगळण्यात आले.
 
युवा ऑफ स्पिनर श्रेयंका पाटील, वेगवान तितास साधू, अरुंधती रेड्डी, अष्टपैलू अमनज्योत कौर आणि यष्टिरक्षक उमा छेत्री यांना पहिल्यांदा स्थान देण्यात आले. यास्तिका भाटिया, राधा यादव, अमनज्योत कौर, स्नेह राणा आणि पूजा वस्त्राकर या ’क’ गटात आहेत. मेघना सिंग, देविका वैद्य, सब्बीनेनी मेघना, अंजली सरवानी आणि हरलीन देयोल यांना मात्र करारात स्थान मिळू शकले नाही.

Related Articles