E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक ,संपादकीय
नव्या धोरणात व्यावसायिक शिक्षणावर भर
Samruddhi Dhayagude
26 Mar 2025
ऐसपैस शिक्षण : संदीप वाकचौरे
देशातील शिक्षण प्रक्रियेच्या संदर्भात वारंवार प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. शिक्षण घेऊनही हाताला काम नाही, शिक्षण कुचकामी ठरत असल्याचा ठपका सातत्याने ठेवला जात आहे. शिक्षण दिवसेंदिवस कौशल्ययुक्त बनण्याऐवजी माहितीसंपन्न बनत चालले आहे. हाती पदवी, पदव्युत्तर शिक्षण घेऊन सरकारी नोकरी नाही, खासगी क्षेत्रातही फारसे यश मिळत नाही. देशातील बेकारीचा आलेख उंचावत असताना, शिक्षण अधिक व्यावसायिकतेच्या दिशेने घेऊन जाण्याची गरज असल्याचे मत सातत्याने व्यक्त होत आहे.
मुळात देशाची वाढती लोकसंख्या, त्यातच आपला देश सर्वाधिक तरुणांचा देश आहे. याचा अर्थ श्रम करणारा हातांचा हा वर्ग आहे. त्यामुळे शिक्षण घेऊनही हे हात बेकार राहणार असतील, तर शिक्षणही कुचकामी ठरण्याची शक्यता बनते. त्यामुळे शिक्षण अधिकाधिक व्यावसायिकतेच्या दिशेने घेऊन जाण्याची गरज आहे. त्या दिशेने जाण्यासाठी शिक्षणाचा विचार अधिक महत्त्वाचा आहे. त्यामुळे काळाची आव्हाने पेलण्याची क्षमता शिक्षणाच्या माध्यमातून घडायला हवी. भारत सरकारने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० जाहीर केले. त्या धोरणात व्यावसायिक शिक्षणाचा मांडलेला विचार अधिक महत्त्वाचा ठरणार आहे. त्या दिशेने पावले पडली तर उद्याचे बेकार हात निश्चितपणे कामात गुंतलेले दिसतील.
श्रमाचे मूल्य
व्यावसायिक शिक्षणाच्या वाटा चालण्यासंदर्भात शिक्षण धोरणात बरेच काही बोलले गेले आहे; मात्र इतिहासात त्या पाऊलवाटा चालण्याचा प्रयत्न म्हणून कार्यानुभवाचा विचार केला गेला होता; मात्र त्याचे काय झाले हे आपण पाहतो आहेत. त्यामुळे इतिहासात जे घडले ते घडू नये. ते घडू नये म्हणूनच पहिल्या पावलापासूनच प्रयत्न झाले, तर भविष्याचे चित्र बदललेले आपणास अनुभवता येईल. १९६५-६६ मध्ये कोठारी आयोगाने देखील त्या दिशेचा विचार आपल्या अहवालात केला होता. व्यावसायिक शिक्षणाच्या दृष्टीने कौशल्य विकसित व्हावीत, श्रमाचे मूल्य मनामनात रूजावे म्हणून कार्यानुभवासारखा विषय अंतर्भूत केला होता. वर्तमानात शिक्षण हे हाताच्या श्रमापासून पूर्णतः दूर गेले आहे. तेव्हाही पालकांना शिक्षण हे अधिकाधिक बौद्धिक हवे होते आणि श्रमापासून दुरावलेले शिक्षण हवे आहे. आपल्या देशात श्रमाचे मोल गेल्या काही दशकात शिक्षणापासून दूर जाताना दिसते. शिक्षणाच्या संदर्भाने विविध आयोग, समित्या येतात, त्या शारीरिक श्रमाबद्दल सातत्याने शिफारशी करतात; मात्र समाजमनाला शिक्षण आणि श्रम यांचे नाते नको आहे. त्यामुळे शिक्षणातून व्यावसायिक शिक्षणाचा विचार पूर्वी केला असला तरी त्या दिशेने मात्र पावले पडली नाहीत. आता पुन्हा केंद्र सरकारच्या वतीने राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० जाहीर केल्यानंतर त्यातही व्यावसायिक शिक्षणाचा विचार अधिक गंभीरतेने करण्यात आला आहे.
धोरणाच्या संदर्भाने राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा जाहीर केल्यानंतर आपल्या राज्याने देखील राज्य अभ्यासक्रम आराखडा जाहीर केला आहे. सहावीपासून पुढे आपल्याही अभ्यासक्रमात व्यावसायिक शिक्षणाच्या तासिका निश्चित केल्या आहेत. त्यामुळे किमान त्या तासिका व्यावसायिक शिक्षणाच्या क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी उपयोगी पडतील, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही, अन्यथा सध्या कला, शारीरिक शिक्षण आणि कार्यानुभव तासिकांबाबत जो विचार शाळांच्या अध्ययन, अध्यापन प्रक्रियेत जे वास्तवात दिसते, ते वर्तमानात अपेक्षित केलेल्या व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भाने घडू नये, अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही. हात बेकार राहिले की, पालक, समाज सर्वांना व्यावसायिक शिक्षणाची आठवण होते; मात्र त्या दिशेने शिक्षणात काही पावले पडले की, केवळ श्रेणीचा विषय म्हणून त्याकडे दुर्लक्ष करायचे. श्रमाचा विचार शिक्षणातून हद्दपार करण्याची भूमिका घ्यायची आणि मग हाताला काम नाही तेव्हा कौशल्याधारित शिक्षण हवे, अशी भूमिका प्रतिपादन करायची. यामुळे आपणच आपले नुकसान करून घेत आहोत.
धोरणाने जी भूमिका प्रतिपादन केली आली आहे, त्यानुसार राज्य अभ्यासक्रमातही विवेचन करण्यात आले आहे. वयानुरूप योग्य शिक्षण, व्यावसायिक शिक्षणाचा दृष्टिकोन वयानुरूप योग्य असण्याची आवश्यकता आहे. याची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सामान्य किंवा पूर्व व्यावसायिक क्षमतेपासून एखाद्या विशिष्ट व्यवसायासाठी लागणार्या क्षमतांपर्यंत करण्याची गरज आहे. आराखड्यात असेही नमूद करण्यात आले आहे की, पायाभूत स्तरांमध्ये विद्यार्थ्यांना विविध उपक्रमांद्वारे व्यवसाय शिक्षणाचा अनुभव दिला जाईल. पूर्वतयारी स्तरावर असेच अनुभव घेत विद्यार्थ्यांना स्थानिक व्यवसायांची ओळख करून दिली जाईल, तसेच त्यातील सहभाग व समानतेची माहिती दिली जाईल. पूर्वमाध्यमिक स्तरातील हे ज्ञान एका विशिष्ट अभ्यासक्रमात बदलले जाईल. यामध्ये विद्यार्थी विविध प्रकारच्या व्यवसायाकरिता आवश्यक असणार्या क्षमता प्राप्त करतील. माध्यमिक स्तरामध्ये विद्यार्थ्यांना एक किंवा अधिक व्यवसाय निवडण्याची संधी दिली जाणार आहे. आराखड्यात व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भाने बरेच काही नमूद केले असले तरी, त्या दिशेने पावले पडण्यासाठी सर्वांनीच आग्रही भूमिका घेण्याची गरज आहे.
व्यावसायिक क्षमता
व्यावसायिक शिक्षणाच्या संदर्भाने शक्य तितके स्थानिक व्यवसायाचे शिक्षण देण्याचा विचार केला गेला आहे. तो विचार करताना विद्यार्थी ज्या स्थानिक परिसरात राहतो तेथील स्थानिक संदर्भ, संबंधित व स्थानिक पातळीवर उपलब्ध असणारे साहित्य व यंत्रसामग्री यांचा विचार करून त्यांच्या माध्यमातून प्राप्त होणार्या व्यावसायिक क्षमता विकसित करण्याची अपेक्षा करण्यात आली आहे. त्यासाठी स्थानिक उपयोगी व्यावसायिक शिक्षण देण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे. जेणेकरून स्थानिक व्यवसाय आणि त्यासंबंधीचे कौशल्य सहजतेने विद्यार्थ्यांच्या हाती उपलब्ध होईल. खरेतर ही मोठी अपेक्षा आहे. आपल्या राज्यातील भौगोलिक पार्श्वभूमी भिन्न आहे. त्या परिस्थितीत स्थानिक गरजा लक्षात घेऊन हातांमध्ये कौशल्य रूजवण्याचा विचारही महत्त्वाचा आहे. उदयोन्मुख व्यवसाय शिक्षण विद्यार्थ्यांना स्थानिक पातळीवर उपलब्ध असणार्या व्यवसायाबाहेरील इतर व्यवसायाचे शिक्षण देण्यात यावे अशी भूमिका घेण्यात आली आहे. जेणेकरून अर्थव्यवस्थेची गरज व तरुणांची महत्त्वाकांक्षा पूर्ण करणार्या नावीन्यपूर्ण व्यवसायाची निवड विद्यार्थी करू शकतील. विविध प्रकारच्या व्यवसायांची ओळख विद्यार्थ्यांना करून देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. मुळात आपल्याकडे विद्यार्थी पदवी घेतो तरी त्याला स्थानिक व्यवसाय संदर्भाने कोणतीही माहिती नसते. त्यामुळे कौशल्यांचा विचार तर अधिक दूर आहे. त्यामुळे एकाच वेळी माहिती घेणे आणि त्यासंदर्भाने कौशल्य विकसित करण्याची गरज आहे.
ज्या व्यवसायांची माहिती घरी होत नाही, अशा प्रकारच्या व्यवसायांची ओळख शाळेत दिली पाहिजे. ही भूमिका देखील अधिक महत्त्वाची आहे. जर एखादा विद्यार्थी घरी शेतामधील कामे करीत असेल, तर त्याला उत्पादन व सेवा प्रकारातील व्यवसायांची ओळख करून दिली पाहिजे. ज्यायोगे शाळेतील वेळही या उत्पादन व सेवा प्रकारच्या कामात व्यतीत होईल. आज आपल्याकडे शेती हा मुख्य व्यवसाय मानला गेला तर शेतीच्या उत्पादनाला भाव मिळत नाही. मग शेतकरी आत्महत्या करतात. आपल्याकडे संत्री, केळी, द्राक्षे, चिक्कू यांसारखी फळे पिकवली जातात; मात्र बाजारात भाव नसला तर शेतकर्याला मिळेल त्या भावात आपले उत्पादन विकावे लागते. त्याचे कारण या नाशवंत पिकांच्या संदर्भाने आपल्याकडे स्थानिक पातळीवर कोणतेही व्यवसाय सुरू नाहीत. कच्च्या मालावर प्रक्रिया करून उत्पादन विकले तर शेतकर्यांना योग्य भाव मिळेल, त्यात स्थानिक पातळीवर शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणातून अशा प्रकारचे व्यवसाय उभे राहण्याच्या दृष्टीने व्यवसायांची ओळख करून देण्याची गरज आहे. तसे घडेल तर केवळ शिक्षणाचे नाही, तर समाजाचेही आर्थिक, सामाजिक चित्रही बदलेल अशी अपेक्षा आहे. अर्थात या शिक्षणाच्या पाऊलवाटेने जात असताना समानतेचा म्हणून सद्यःस्थितीत सामाजिक असमानतेचा विचार करून एखाद्या व्यवसायाचे शिक्षण एखाद्या विशिष्ट विद्यार्थी समुदायाला देणे टाळले पाहिजे हे लक्षात घ्यायला हवे. अन्यथा पुन्हा जाती आणि व्यवसाय यांचे असणारे नाते भक्कम होण्याची शक्यता आहे. असे घडू नये असे वाटत असेल, तर त्याबद्दल अधिक काळजी घेण्याची गरज आहे.
समानतेचा विचार
विविध प्रकारची कामे करत असताना विद्यार्थ्यांना त्यांची घरची परिस्थिती किंवा लिंगभेद विचारात न घेता करण्यासाठी प्रोत्साहित केले पाहिजे, जेणेकरून समानतेचा विचार विद्यार्थ्यांमध्ये रुजेल. हाताने काम करण्याचे शिक्षण व त्याचे मूल्य व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना त्यांच्या हाताने काहीतरी काम करण्याची संधी देते, तसेच त्या कामाचे महत्त्व शिकवते, अशा अनुभवाशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. आतापर्यंत व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी एक तर गरीब परिस्थिती असणारे होते किंवा अभ्यासात मागे पडणारे होते; पण या आराखड्याने हे चित्र बदलण्याचा केलेला विचार अधिक महत्त्वाचा आहे. सर्व विद्यार्थी व्यावसायिक शिक्षण घेतील, ज्यामुळे शैक्षणिक विषमता निर्माण न होता समानता निर्माण होईल, असा विचार करण्यात आलेला आहे. व्यवसाय हा जीवनाचा महत्त्वाचा भाग आहे. व्यवसाय शिक्षण दैनंदिन जीवन आणि आर्थिक सहभागाशी संबंधित व्यावहारिक बाबी हाताळण्यासाठी व्यक्तींना सक्षम करणे. व्यावसायिक शिक्षण विद्यार्थ्यांना अर्थपूर्ण आणि परिपूर्ण जीवन जगण्यासाठी काय करायचे आहे हे ओळखण्यासाठी विविध प्रकारच्या व्यवसायातील मूलभूत क्षमता विकसित करण्यास सक्षम करण्याचा विचार करण्यात आला आहे.
राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० मध्ये असेही म्हटले आहे की, व्यावसायिक शिक्षणाशी संबंध जोडल्या गेलेल्या सामाजिक दर्जाच्या उतरंडीवर मात करणे हे या धोरणाचे उद्दिष्ट आहे. यासाठी टप्प्याटप्प्याने सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमांचे मुख्य प्रवाहातील शिक्षणामध्ये एकात्मीकरण करणे आवश्यक असणार आहे. लहान वयातच पूर्वमाध्यमिक व माध्यमिक शाळेत व्यवसायांची ओळख करून देण्यास सुरुवात करून, गुणवत्तापूर्ण व्यावसायिक शिक्षणाचे उच्च शिक्षणात सहजतेने एकात्मीकरण केले जाईल.
मूलभूत क्षमतांचा विकास
व्यवसाय शिक्षणाची लक्ष्ये म्हणून विविध प्रकारच्या व्यवसायांची समज व त्याकरिता आवश्यक असणार्या मूलभूत क्षमता विकसित करण्यावर भर दिला जाणार आहे. व्यवसाय शिक्षणामुळे विद्यार्थ्यांमध्ये वेगळ्या व्यवसायासाठी असलेला व्यापक दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल. विद्यार्थी त्यांची वैयक्तिक कामे सुलभ पद्धतीने करतील. व्यावसायिक शिक्षणामुळे विविध व्यवसायांची ओळख व त्यातील संधींची माहिती होईल व व्यवसायासाठी लागणारी कौशल्ये विकसित होतील. व्यावसायिक शिक्षणामुळे एका विशिष्ट व्यवसायाकरिता आवश्यक असणार्या क्षमता विकसित होतील. सर्व व्यवसायांच्या श्रमप्रतिष्ठेबद्दल आदराची भावना निर्माण होईल. कार्याशी संबंधित मूल्ये आणि कल विकसित होण्यास मदत होईल. विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणामध्ये लक्ष देऊन चिकाटीने कार्य करतील. जिज्ञासा, सर्जनशीलता, सहानुभूती, संवेदनशीलता, सहवेदना आणि गटकार्य ही कौशल्ये विकसित होण्यास मदत होईल. असे घडले तर देशाची जागतिक महासत्तेची वाट फारशी दूर नाही.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
26 Mar 2025
लखनऊचा जबरदस्त विजय
28 Mar 2025
नेपाळमध्ये १०० आंदोलकांना अटक
30 Mar 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा
28 Mar 2025
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
27 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
26 Mar 2025
लखनऊचा जबरदस्त विजय
28 Mar 2025
नेपाळमध्ये १०० आंदोलकांना अटक
30 Mar 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा
28 Mar 2025
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
27 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
26 Mar 2025
लखनऊचा जबरदस्त विजय
28 Mar 2025
नेपाळमध्ये १०० आंदोलकांना अटक
30 Mar 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा
28 Mar 2025
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
27 Mar 2025
व्हॉट्सऍप कट्टा
26 Mar 2025
लखनऊचा जबरदस्त विजय
28 Mar 2025
नेपाळमध्ये १०० आंदोलकांना अटक
30 Mar 2025
हुंदाई : वेग घेण्याची अपेक्षा
31 Mar 2025
इफ्तार पार्टीतून जपला सामाजिक एकोपा
28 Mar 2025
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
27 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा
2
खासदारांना भरघोस पगारवाढ
3
‘फिरकी’ने पटकावला पहिला लोकमान्य करंडक
4
एकाच माळेचे मणी (अग्रलेख)
5
न्यायालयाचा अवमान (अग्रलेख)
6
सरकारी पुनर्वसन केंद्रात अन्नविषबाधेमुळे ४ मुलांचा मृत्यू