बीजिंग-वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडावा   

चीनचे पंतप्रधान ली कियांग यांचे मत

बीजिंग : बीजिंग आणि वॉशिंग्टनने संघर्षाऐवजी संवादाचा मार्ग निवडला पाहिजे, कारण दोन्ही देश व्यापार शुल्क आणि बेकायदेशीर फेंटॅनाइल व्यापाराशी लढा देण्याच्या प्रयत्न करत आहेत, असे मत चीनचे पंतप्रधान ली कियांग यांनी व्यक्त केले. ली कियांग यांनी रविवारी अमेरिकन सिनेटर स्टीव्ह डेन्स यांची भेट घेतली. यावेळी फेडएक्स कॉर्पोरेशनचे सीईओ राज सुब्रमण्यम, बोईंग कंपनीचे वरिष्ठ उपाध्यक्ष ब्रँडन नेल्सन, क्वालकॉमचे सीईओ क्रिस्टियानो आमोन आणि फायझरचे सीईओ अल्बर्ट बोरला यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. 
 
ली कियांग म्हणाले, दोन्ही देशांमधील संबंध एका महत्त्वपूर्ण वळणावर पोहोचले आहेत. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांची ट्रम्प यांच्याशी झालेल्या फोनवरील चर्चेत म्हटले होते की, दोन्ही देश असे भागीदार आणि मित्र बनू शकतात, जे एकमेकांच्या यशात योगदान देऊ शकतात. चीन आणि अमेरिका या दोघांनाही सहकार्यातून फायदा होईल. दोन्ही बाजूंनी संघर्षापेक्षा संवाद, शून्य-समी स्पर्धेऐवजी सहकार्याची गरज आहे, असे त्यांनी नमूद केले.चीन-अमेरिका संबंधांच्या स्थिरता आणि विकासाला चालना देण्यासाठी अमेरिका एकत्रीत काम करेल, अशी चीनला आशा आहे, असे ली कियांग म्हणाले. ट्रम्पच्या पहिल्या प्रशासनादरम्यान, जेव्हा टॅरिफ देखील एक मोठा मुद्दा होता, तेव्हा डेन्सने मध्यस्थ म्हणून काम केले. चीनच्या भेटीपूर्वी, डेन्सच्या कार्यालयाने सांगितले, की ते व्हाइट हाऊसशी जवळून समन्वय साधत आहेत आणि अध्यक्ष ट्रम्प यांचा अमेरिका फर्स्ट अजेंडा पुढे नेतील.

Related Articles