हमासच्या वरिष्ठ नेत्यासह १९ पॅलेस्टिनी नागरिक ठार   

गाझामध्ये इस्रायलचे हल्ले

देर अल-बालाह (गाझा पट्टी) : दक्षिण गाझा पट्टीमध्ये शनिवारी रात्री इस्रायलच्या हल्ल्यात हमासच्या वरिष्ठ नेत्यासह १९ पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला, अधिकार्‍यांनी ही माहिती दिली.येमेनमधील इराण-समर्थित हुथी बंडखोरांनी इस्रायलवर आणखी एक क्षेपणास्त्र डागले आणि सायरन वाजण्यास सुरुवात झाली. इस्रायल लष्कराने सांगितले की, हे क्षेपणास्त्र मध्य हवेत डागण्यात आले असून, त्यात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही. दक्षिण गाझामधील दोन रुग्णालयांनी सांगितले, की रात्रभर झालेल्या हल्ल्यात ठार झालेल्या लहान मुले आणि महिलांसह १७ नागरिकांचे मृतदेह रुग्णालयात आणण्यात आले आहेत.हमासने सांगितले की, खान युनिसजवळ झालेल्या हल्ल्यात त्याच्या राजकीय ब्युरो आणि पॅलेस्टिनी संसदेचे सदस्य सलाह बर्दाविल आणि त्यांच्या पत्नीचा मृत्यू झाला. बर्दाविल हे हमासच्या राजकीय शाखेचे एक सदस्य होते. रुग्णालयांनी नोंदवलेल्या मृतांच्या संख्येत हमास नेता आणि त्याच्या पत्नीचा समावेश नाही.
 
मृतांची संख्या ५० हजारांवर 
 
• गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे, की इस्रायल-हमास युद्धात ५० हजाराहून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत, तर आतापर्यंत एक लाख १३ हजाराहून अधिक जण जखमी झाले आहेत. आरोग्य मंत्रालयाने रविवारी दिलेल्या  माहितीमध्ये गेल्या आठवड्यात युद्धविराम संपल्यानंतर इस्रायलने अचानक केलेल्या हवाई हल्ल्यात ठार झालेल्या ६७३ मृतांचाही समावेश आहे. मृतांमध्ये किती नागरिक आणि किती सैनिक आहेत, हे मंत्रालयाने स्पष्ट केले नाही.

Related Articles