न्यू मेक्सिकोत झालेल्या गोळीबारात तीन ठार, १५ जखमी   

लास क्रूसेस : न्यू मेक्सिकोच्या लास क्रूसेस शहरातील एका पार्कमध्ये झालेल्या गोळीबाराच्या घटनेत तीन जण ठार तर १५ जण जखमी झाले, पोलिसांनी ही माहिती दिली.घटनेनंतर शुक्रवारी रात्री दहाच्या सुमारास पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान शहरातील ’यंग पार्क’मध्ये पोहोचले. पार्कमध्ये मोटार शो आयोजित करण्यात आला होता, यावेळी सुमारे २०० नागरिक जमले होते. या मोटार शोसाठी परवानगी घेण्यात आली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. यामध्ये जखमींवर प्रथम घटनास्थळी उपचार करण्यात आले, आणि नंतर त्यांना पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले.
 
लास क्रुसेसचे पोलिस प्रमुख जेरेमी स्टोरी म्हणाले, की उद्यानाच्या एका मोठ्या भागात ५० ते ६० शेल कॅसिंग विखुरलेले आढळले. त्यामुळे येथे   गोळीबार केल्याचे दिसत आहेत. दोन गटांमध्ये गोळीबाराची घटना घडली असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून, त्यात तीन जण ठार तर १५ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये दोन १९ वर्षीय तरुण आणि एका १६ वर्षीय तरुणाचा समावेश आहे. 

Related Articles