भारत होणार तिसरी आर्थिक महासत्ता   

२०२८ पर्यंत शक्य; मॉर्गन स्टॅनलीचा दावा

नवी दिल्ली : भारत जगातील तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. मॉर्गन स्टॅनली संस्थेने नुकताच भारतीय अर्थव्यवस्थेवर एक अहवाल प्रसिद्ध केला. ज्यात २०२८ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या मार्गावर आहेे. भारताचा ग्राहक बाजारपेठ म्हणून उदय तसेच, जागतिक उत्पादनात वाढता वाटा हे यामागचे कारण असल्याचे अहवालात म्हटले आहे.
  
मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार २०२८ पर्यंत भारत जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल तर, २०२३ मध्ये ३.५ ट्रिलियन डॉलर्स असलेली भारतीय अर्थव्यवस्था २०२६ पर्यंत ४.७ ट्रिलियन डॉलर्सपर्यंत पोहचू शकते. यामुळे अमेरिका, चीन आणि जर्मनी नंतर भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल.आर्थिक धोरणे आणि सुधारित पायाभूत सुविधांचे प्रगतीत योगदान असेल. अहवालात सध्याची आर्थिक परिस्थिती, वाढीचे अंदाज, चलनवाढ, व्यापार, चलनविषयक आणि राजकोषीय धोरण आणि संभाव्य जोखीम यावर देखील चर्चा केली गेली आहे. 

Related Articles