बंगल्यात सापडले घबाड   

न्यायाधीश वर्मा यांच्या चौकशीसाठी समिती 

नवी दिल्ली : न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या बंगल्यात मोठी रक्कम सापडल्यानंतर या प्रकरणाची चौकशी करण्याचेे सर्वोच्च न्यायलायने ठरविले आहे. त्या अंतर्गत सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी विभागीय चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. प्रकरणाची चौकशी करण्यासाठी खन्ना यांनी एक समिती स्थापन केली आहे. समिती वर्मा यांच्यावरील आरोपाची सखोल चौकशी करणार आहे. दरम्यान, वर्मा यांना न्यायालयात तूर्त काम करण्यास मनाई देखील करण्यात आली आहे. दरम्यान, दिल्ली उच्च न्यायालयाने वर्मा यांच्या घरातील घटनांचा मागोवा घेतला असून त्याबाबतचा घटनाक्रम सर्वोच्च न्यायलयाच्या संकेतस्थळावर टाकला आहे. त्यात उच्च न्यायालयाचा अहवाल आणि चित्रफीत देखील आहे. दिल्ली अग्निशमन विभागानेे दावा केला की, आग नियंत्रणात आणताना कर्मचार्‍यांना कोणतीही रक्कम सापडली नाही.

Related Articles