वाल्हे परिसरात साथीच्या रोगाचे थैमान   

वाल्हे, (वार्ताहर) : वाल्हे (ता. पुरंदर) येथे मागील काही दिवसापासून जुलाब, उलट्यांचे साथ सुरू झाली आहे. गावातील ८० ते ९० जणांना जुलाब उलट्या होत असल्याने अनेक जण प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच खाजगी रूग्णालय साथीच्या रोग्यांनी गच्च भरले आहेत. रूग्णालयात रूग्णाला ठेवायला जागा उरली नसून वाल्हे परिसरात अक्षरशः साथीच्या रोगानी थैमान घातले आहे.      
 
ग्रामपंचायत शेजारून वाहणार्‍या ओढ्यावर बंधारा बांधलेला असून त्यामध्ये गावचे ड्रेनेज लाईनचे पाणी ओढ्यात सोडल्यामुळे पाणी साठवून त्यावर शेवाळ व गवत वाढलेले आहे, त्यामुळे बंधार्‍यातील पाणी दूषित झाले असून पाण्याची दुर्गंधी सगळीकडे पसरली आहे. बंधारा परिसरात असलेल्या विहिरी व बोर मधील जलस्रोत दूषित झाले आहेत तसेच घाणीचे साम्राज्य वाढले आहे. या साठलेल्या पाण्यामुळे डासांचे प्रमाण वाढले असून त्यामुळे साथीच्या आजाराचे प्रमाण वाढले आहे, तरी प्रशासनाने गावात तातडीने सर्वे करून प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Related Articles