वादग्रस्त विधानामुळे कुणाल कामरा चर्चेत   

व्हिडीओला मात्र चाहत्यांकडून दाद 

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या विनोदाने खळबळ उडवून देणारा विनोदी कलाकार कुलन कामरा कोट्यवधींच्या मालमत्तेचा मालक आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर वादग्रस्त टीका करणाऱ्या कामरा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. वादग्रस्त टिप्पणीमुळे एकनाथ शिंदे गट संतप्त झाला. आपल्या विधानांमुळे अनेकदा वादात सापडणारा स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा एका शोसाठी लाखो रुपये घेतो. सध्या वादग्रस्त विधान करून तो शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांचे लक्ष्य बनला आहे. कामगार त्याच्या विरोधात निदर्शने करत असून एफआयआर देखील नोंदवण्यात अली आहे.
 
कोण आहे कुणाल कामरा?
 
कुणाल कामरा हा एक प्रसिद्ध स्टँड-अप कॉमेडियन आणि युट्यूबर आहे. तो २०१७ पासून युट्यूबवर व्हिडिओ बनवत आहे. तो त्याच्या 'शट अप या कुणाल' या शोमुळे चर्चेत राहिला आणि या शोद्वारे त्याला ओळख मिळाली. विनोद आणि वादांशी त्यांचा दीर्घकाळ संबंध आहे. कुणालचे स्वतःचे युट्यूब चॅनेल आहे. सोशल समाजमाध्यमांवर त्याचे खूप चाहते आहेत. कामराचे यूट्यूबवर २३.३ लाख फॉलोअर्स आहेत. एक्सचे २.२९ दशलक्ष फॉलोअर्स आहेत. इंस्टाग्रामवर त्याच्या फॉलोअर्सची संख्याही दहा लाख आहे. त्याच्या विनोदासोबतच, तो अनेकदा वादग्रस्त विधाने करून गोंधळ निर्माण करतो.
 
वादग्रस्त विधान पण चाहत्यांकडून डोनेशन देत मिळाली दाद 
 
कुणाल कामराने त्याच्या एका कार्यक्रमात ईडी आणि सीबीआय वर गाणं सादर करून नरेंद्र मोदींवर टीका केली. इथेच तोच थांबला नाही तर शिवसेनेबद्दल बोलताना त्याने एकनाथ शिंदेंवरही गाणे बनवले आणि तोच वादाचा मुद्दा ठरला. त्या नंतर त्याने अजूनही बरीच गाणी गायली ज्यात त्याने सरकारवर भाष्य केले आहे. या गाण्यांमुळे आणि त्या संपूर्ण कार्यक्रमामुळे शिंदेंच्या शिवसेनेचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी तोडफोड सुरु केली. हे सर्व जरी झाले असले तरीही हा व्हिडीओ अजूनही समाजमाध्यमांवर पाहता येत असून तो व्हिडीओ १६ लाखांहून अधिक माणसांनी पहिला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १७ हजार कंमेंट्स आल्या आहेत. विशेष म्हणजे कंमेंट बॉक्स मध्ये त्याला पैश्यांच्या स्वरूपात खूप डोनेशन मिळताना दिसते. 
 
मुंबई पोलिसांचाही कुणाल कामरावर संताप 
 
कुणाल कामराने गायलेल्या गाण्यांमध्ये मोदी, एकनाथ शिंदे यांच्यासह पोलिसांवरही गाणे तयार करण्यात आले. पोलिसांवर केलेल्या गाण्यामुळे पोलिसांचाही संताप झाला आज. घडलेल्या घटनेमुळे कुणाल कामरावर काही कारवाई होणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

Related Articles