कृत्रिम बुध्दिमत्तेला भारतीय तत्वज्ञान हा उत्तम पर्याय   

आनंद हर्डीकर यांचे प्रतिपादन                         

पुणे : चॅट जीपीटी आणि कृत्रिम बुद्धीमत्ता यांचा मूळ स्त्रोत चिनी तत्वज्ञान आणि चिनी ग्रंथात आढळून येतो. चीनच्या तुलनेत भारतीय तत्वज्ञान आणि ग्रंथ परंपरा अधिक समृध्द आहे. त्यामुळे केवळ कृत्रिम बुध्दीमत्ता या तंत्रज्ञानाच्या मागे न धावता भारताच्या समृध्द वारश्याला आणि परंपरेला मानवी प्रज्ञेची जोड मिळाल्यास जागतिक स्तरावर भेडसावणार्‍या अनेक प्रश्नांवर भारत उत्तरे शोधू शकतो, असा विश्वास ज्येष्ठ लेखक आनंद हर्डीकर यांनी व्यक्त केला.                                
 
मिहाना पब्लिकेशन्सतर्फे मेजर (निवृत्त) मोहिनी गर्गे-कुलकर्णी लिखित ‘अपराजिता’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवारी खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी हर्डीकर बोलत होते. फर्ग्युसन महाविद्यालयात झालेल्या या कार्यक्रमला मेजर जनरल (निवृत्त) शशिकांत पित्रे, लेखिका मेजर (निवृत्त) मोहिनी गर्गे-कुलकर्णी आणि मिहाना पब्लिकेशन्सच्या संचालिका अमृता कुलकर्णी आदी उपस्थित होते.       
 
हर्डीकर म्हणाले, पुरातन काळापासून कळत-नकळत स्त्रियांच्या क्षमता आणि योगदानाकडे अक्षम्य दुर्लक्ष झालेही असेल, पंरतू ही एक बाजू असली तरी पाश्चात्य देशांच्या तुलनेत भारतीय स्त्रीकडे आदर आणि सन्मानानेच पाहिले जात होते. भारतीय इतिहासात होऊन गेलेल्या विरांगनांच्या बहुआयामी व्यक्तीमत्वांचा परिचय या पुस्तकातून होतो. भारतीय वीरांगनांच्या स्त्रीवादावरचा हा एक मौलिक ग्रंथ आहे. डॉ. मेधा कुलकर्णी म्हणाल्या, भारतीय भूमी ही नररत्नांबरोबर नारीरत्नांची देखील खाण आहे. इतिहासाच्या धुराळ्यात अनेक विरांगना दुर्लक्षित राहिल्या. मॅकेलेच्या शैक्षणिक रणनितीमुळे भारतीय समाजावर न्यूनगंड बिंबवला गेला. माझ्या मते पानिपतचे युद्ध हे पराभवाचे द्योतक नसून शौर्याचा इतिहास आहे. शौर्य हे धर्मावर किंवा धर्मावर अवलंबून नसते.  

Related Articles