पुणे : एका महिलेचा हात पकडून मारहाण करून विनयभंग करणार्या आरोपीच्या विरोधात गुन्हा घडल्यानंतर चोवीस तासात सबळ पुराव्यानिशी लोणी काळभोर पोलिसांनी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. अजय दिलीप भोसले (वय ३२, रा. ड्रिम्स निवारा सोसायटी, कोरेगाव मूळ ता. हवेली) असे आरोपपत्र दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी एका ३१ वर्षाच्या विवाहित महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणी काळभोर गावातील एका व्यक्तीने १७ मार्च रोजी दुपारी चारच्या सुमारास महिलेचा हात धरून ’तू मला सोडून येथून जाऊ नकोस, तू मला खूप आवडतेस, मी तुझ्या वाचून जगू शकत नाही, माझ्याशी प्रेमसंबध ठेव, असे म्हणत विनयभंग केला. तिने त्यास नकार देऊन ढकलून दिले. त्यानंतर त्या व्यक्तीने महिलेस शिविगाळ करून मारहाण केली. या घटनेनंतर महिलेने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात त्या व्यक्तीविरोधात तक्रार दिली. या प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक सर्जेराव बोबडे यांनी आरोपीविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करून गुन्ह्याचा तपास केला.
Fans
Followers