शिरूर, (प्रतिनिधी) : शिरूर जोशीवाडी येथून दहा वर्षीय मुलीचे अपहरण करणार्या तिघांना शिरूर पोलीस स्टेशनच्या तपास पथकाने अटक केली असून, अपहरण केलेल्या बालिकेची मुंबई येथून सुटका करून नातेवाईकांच्या ताब्यात दिली असल्याची माहिती शिरूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी सांगितले. अटक केलेल्या मध्ये दोन महिलांचा समावेश असून बालिकेची सुखरूप सुटका केल्याने शिरूर पोलिसांची कौतुक होत आहे. लताबाई बसीर काळे, आकाश बसीर काळे, सुप्रिया उर्फ रॅम्बो आकाश काळे (सर्व सोने सांगवी ता. शिरूर) यांना पोलिसांनी अटक केली आहे.
Fans
Followers