शाहरुखसोबत विराटच्या भन्नाट नृत्याला करोडो चाहत्यांची पसंती   

कोलकाता : रिंकू अन् दिशा पटानीच्या ठुमक्यांनी गाजवली आयपीएल सेरेमनी आयपीएल २०२५ चा उद्घाटन सोहळा चाहत्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक शानदार होता. आयपीएल २०२५ चा उदघाटन सोहळा चाहत्यांच्या अपेक्षेपेक्षाही अधिक शानदार होता. लीगच्या पहिल्या सामन्याच्या अगदी आधी, कोलकात्याच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर उदघाटन समारंभ आयोजित करण्यात आला होता.
 
ईडन गार्डन्स येथे झालेल्या लीगच्या १८ व्या हंगामाच्या उदघाटन समारंभाची जबाबदारी बॉलिवूड स्टार शाहरुख खानने घेतली.श्रेया घोषाल स्टेजवर आली आणि तिने जिंदा है तो, ओम शांती ओम, कर हर मैदान फतह अशी गाणी गाऊन सुरुवात केली.श्रेया घोषालनंतर, दिशा पटानीने स्टेजवर ठुमक्यांनी आयपीएल सेरेमनी गाजवली. त्यांच्यानंतर पंजाबी पॉप गायक करण औजला यांनीही चाहत्यांचे मनोरंजन केले.पण ऐतिहासिक ईडन गार्डन्स स्टेडियमवर उपस्थित असलेले हजारो चाहते जेव्हा विराट आणि रिंकू शाहरुखसोबत स्टेजवर आले तेव्हा सर्वात जास्त आनंदी दिसत होते. हजारो चाहत्यांसमोर विराट कोहली आणि रिंकू सिंगला शाहरुख खानने त्यांच्या गाण्यांवर नाचायला लावले.

Related Articles