E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
बलुचिस्तानचा स्वातंत्र्य संघर्ष
Wrutuja pandharpure
24 Mar 2025
भालचंद्र ठोंबरे
एकाच आठवड्यात दोन वेळा दहशतवादी कारवाया करून बीएलएच्या माजीद ब्रिगेडने पाकिस्तानी सेनेला जबरदस्त धक्का देऊन आपला स्वातंत्र्य लढा तीव्र केल्याचे संकेत दिले आहेत. ११ मार्च रोजी पाकिस्तानच्या क्वेटावरून पेशावरकडे जाणार्या जाफर एक्सप्रेसला गुडलास व पिस कुनरीच्या डोंगराळ भागात रेल्वे रूळ उडवून हायजॅक केले. या रेल्वेत ४०० च्या वर प्रवासी होते, त्यात शंभरहून अधिक पाकिस्तानी सुरक्षा सैनिक होते. दहशतवाद्यांनी स्त्रिया व मुलांना सोडून दिले व अन्यच्या मोबदल्यात अटकेत असलेल्या बलुच लिब्रेशन आर्मीच्या दहशतवाद्यांची मुक्तता करण्याची मागणी केली. प्रकरणाच्या अखेरच्या घटनेबाबत पाकिस्तान आणि बलूचचे वेगवेगळे दावे आहेत. पाकिस्तानने पत्रकार परिषद घेऊन सर्व दहशतवादी ठार करून प्रवाशांची मुक्तता केल्याची घोषणा केली आहे, तर बीएलएने अद्यापही २०० च्या वर प्रवासी आपल्या ताब्यात असल्याचा दावा केला आहे.
या प्रकरणाची शाई वाळते न वाळते तोच क्वेटावरून तात्फानला जाणार्या सेनेच्या पथकाला घेऊन जाणार्या बसवर बीएलएने हल्ला केला. त्यात नव्वद सैनिक ठार झाल्याचा दावा बीएलएने केला, तर पाकिस्तानने सात सैनिक ठार व २१ जण जखमी झाल्याचे म्हटले आहे. भारत व अन्य देशांत दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देणार्या पाकिस्तानमध्ये बीएलए, बीएलएफ, टीटीपी, आदी संघटनांनी पाकिस्तानच्या नाकी नऊ आणले आहे. या कारवायांनी धास्तावलेल्या पाकिस्तानच्या शासनाने खेळण्यातील बंदुकीच्या खरेदी-विक्रीवरही बंदी घातल्याचे वृत्त आहे. काश्मीरमधील दहशतवादी कारवायांबद्दल बोलताना पाकिस्तान नेहमी हा काश्मिरी जनतेचा स्वातंत्र्यासाठी संघर्ष आहे, असे ढोल बडवत असतो, मग बलुची लोकांच्या या घातपाताच्या कारवायासुद्धा त्यांच्या स्वातंत्र्याचा संघर्ष आहे असे म्हणण्याची हिंमत पाकिस्तान दाखविणार काय? बलुचिस्तानात आज बलुचिस्तानच्या मुक्तीसाठी, बलोच लिबरेशन फ्रंट, बलोच लिबरेशन आर्मी, बलोच रिपब्लिकन गार्ड, बलोच लिबरेशन टायगर, बलोच नॅशनॅलिस्ट आर्मी, युनायटेड बलोच आर्मी आदी संघटना कार्यरत आहेत.
उपेक्षित व पीडित बलुची जनता
बलुचिस्तान हा क्षेत्रफळाने सर्वांत मोठा; पण कमी लोकसंख्या असलेला प्रदेश आहे. याचे क्षेत्रफळ अंदाजे १३४०५१ चौरस मैल असून बहुसंख्य लोकसंख्या बलोच आहे. त्यानंतर पश्तुन, ब्राहुई, हजारास, सिंधी, पंजाबी, मिर्री आहेत. येथे मुख्यत्वे बालोची, उर्दू, पश्तो व ब्राहूई भाषा बोलली जाते. बलुचिस्तानमधून पाकिस्तानला प्राकृतिक गॅस व तेल मिळते, तसेच बलुचिस्तानमध्ये कोळसा, सोने, तांबे, युरेनियम आदी खनिजे मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेला बरीचशी मदत होते; मात्र यातून बलुचिस्तानला काहीही मिळत नाही. राजकारण, सेना, अन्य संस्था, उद्योगधंदे, यात पंजाबी मुसलमानाचे वर्चस्व आहे. बलुचिस्तानातील संसाधनावर सेनेतील अधिकारी धनवान होत आहेत, तर बलोच जनतेच्या वाट्याला अत्याचार, जुलूम, महिलांवर बलात्कार, पळून नेणे आधी दुर्दैवी घटना आहे. त्यामुळे बलुची जनता त्रस्त आहे. सरकारी नोकरीत बलोच जनतेला जागा नाहीत, त्यांना गद्दार समजले जाते. त्यातच चीनच्या बिल्ड अँड रोड प्रकल्प तसेच बंदरे विकसित कार्यक्रमामुळे चिन्यांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे आपल्याच भागात आपण दुर्लक्षित व अल्पसंख्याक होण्यासारखी परिस्थिती होत आहे, याची भीती बलुची लोकांना आहे. बलुची जनतेची संस्कृती, ओळख, भाषा पाकिस्तानपेक्षा वेगळी आहे; मात्र आपली हीच ओळख पद्धतशीरपणे मिटविण्याचे षडयंत्र पाक सेना करीत असल्याचा बलूच जनतेचा आरोप असून त्यामुळे त्यांना आता पाकिस्तानपासून अलग व्हावयाचे आहे. या भागात पुरेशा प्रमाणात वाहतूक, वीज, पाणी यांच्या सुविधा नसल्यामुळे या भागाचा विकास झालेला नाही. बलुचिस्तानच्या किनार्यावरील ग्वादर बंदर पाकिस्तानने चीनला विकसित करण्यासाठी दिले आहे. याच बलुचिस्तानमध्ये चगाई येथे पाकिस्तानचे परमाणु परीक्षण स्थळ आहे.
जबरदस्तीने कब्जा
१५ ऑगस्ट १९४७ रोजी कलात स्वतंत्र झाला. जिन्नाने कलातच्या खानला कलातला पाकिस्तानमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला. खानने ही बाब स्पष्टपणे फेटाळली. एवढेच नव्हे तर जनतेचाही या संभाव्य विलयाला विरोध होता. तेव्हा जीन्ना यांनी १८ मार्च १९४८ रोजी खरान लासबुल व मकरान यांना कलातपासून वेगळे केल्याची घोषणा केली व २७ मार्च १९४८ रोजी कलातवर हल्ला करून खानकडून जबरदस्तीने विलीनीकरणाच्या करारावर सह्या घेतल्या. अशा प्रकारे पाकिस्तानने विश्वासघाताने बलुचिस्तान बळकावला.या जबरदस्तीच्या विलीनकरणाविरुद्ध बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानविरुद्ध असंतोष उफाळला व गेल्या ७५ वर्षांपासून याविरुद्ध बलुचिस्तान सतत संघर्ष करीत आहे. कलातच्या खानचे बंधू अब्दुल करीम यांनी बंडाचे निशाण उभारले, त्यांना कैद करण्यात आले. १९५८ मध्ये झालावनचे नबाब नौरोज खान यांनी पाकच्या धोरणाविरुद्ध लढा दिला; मात्र त्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप लावून कैदेत टाकण्यात आले. त्यांचा कैदेतच मृत्यू झाला. १९६० मध्ये शेख मुहम्मद बीजराणी मर्री यांच्या नेतृत्वात मोठ्या प्रमाणात उठाव करण्यात आला; मात्र ६९ मध्ये तो दडपण्यात आला.१९७३ मध्ये पाकिस्तानने बलुचिस्तानचे प्रांतीय सरकार बरखास्त करून लष्करी कायदा लागू केला. त्यामुळे सशस्त्र विद्रोह सुरू झाला. मीर जाफरखान यांनी बलुच पिपल लिबरेशन फ्रंटची स्थापना केली. यात मोठ्या प्रमाणात सामील झालेल्या मर्री व मेंगल आदिवासींनी संघर्ष केला. हा शमवण्यासाठी इराणच्या मदतीने त्या भागात बॉम्ब वर्षाव करण्यात आला. त्यात अंदाजे सात ते आठ हजार बलुच आंदोलक व नागरिक मरण पावले, तर जवळपास ३००० च्या आसपास पाक सैनिक ठार झाल्याचा दावा करण्यात आला होता; मात्र बंडावर काबू मिळविण्यात आला.
जनरल मुशर्रफ यांच्या काळात जानेवारी २००५ मध्ये सुई भागात पेट्रोलियम कंपनीत काम करणार्या एका जोडप्यातील डॉक्टर महिलेवर एका सेनाधिकार्यांनी बलात्कार केला. त्या अधिकार्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बलोच जनतेने मोर्चा काढला; मात्र मुशर्रफ यांनी हा सेनेला बदनाम करण्याचा डाव आहे, असे सांगत कारवाई नाकारली. त्यामुळे असंतोष वाढला. पाकिस्तानने ७ एप्रिल २००६ रोजी बीएलएला दहशतवादी संघटना घोषित केले. ऑगस्ट २००६ मध्ये बलुच राज्याचे माजी मंत्री व माजी राज्यपाल राहिलेले व त्यावेळी बीएलएचे नेते असलेल्या नबाब अकबर बुगती यांना त्यांच्या सहकार्यासह पाक सेनेने पहाडी गुहेत ठार केले. त्यामुळे बीएलएमध्ये तीव्र असंतोष झाला व संघटना अधिक एकवटली. अकबर बुग्तीनंतर बालोच हा संघटनेचा नेता झाला. २००७ मधील एका पाक सेनेच्या कारवाईत बालोच ठार झाला. त्यानंतर ब्रह्मदाग बुग्ती हा संघटनेचा नेता झाला. त्याने १५ एप्रिल २००९ रोजी गैर बलोचवर हल्ले करण्याचे आवाहन केले. त्या कारवाईत पाचशे लोक ठार झाले. २०१० मध्ये शैक्षणिक संस्थांनाही लक्ष करण्यात आले. घातपाती कारवायांची तीव्रता हळूहळू वाढू लागली. बलुचिस्तानात असलेल्या व बॅरिस्टर जीनाच्या शेवटच्या दिवसात त्यांनी वास्तव्य केलेली इमारत बीएलएने नष्ट केली व त्यावरील पाकिस्तानचा ध्वज काढून त्यावर बलुचिस्तानचा ध्वज फडकविला. पाकिस्तानने पुन्हा त्यावर कब्जा करून इमारत दुरुस्त केली.
२०१७ मध्ये बीएलए संघटनेत मोठे फेरफार झाले. दोन कमांडर उस्ताद असलम व अकबर जेब यांना संघटनेतून काढून टाकण्यात आले. त्यांनी आपला स्वतःचा अलग गट बनविला; मात्र पुढे तोच गट मुख्य बीएलए ठरला. असलमच्या काळातच आत्मघातकी पथके निर्माण झाली. २०१८ मध्ये चिनी दूतावासावर हल्ला करण्यात आला. त्यानंतर पाक सेनेच्या एका कारवाईत असलम ठार झाला, तर अकबर जेब नेता झाला. बीएलएकडे आजच्या घटकेस अंदाजे सहा हजाराच्या आसपास सैनिक असून अंदाजे शंभर महिलांचे आत्मघातकी पथक आहे. २०२४ पासून संघटनेने आंदोलन अधिक तीव्र केले. २०२४ मध्ये ३०२ हल्ले करून ५८०च्या वर लोकांना ठार केले, तर ३७० च्या वर लोक जखमी झाले. पूर्वी संघटनेत कबालीचा भरणा असायचा व साधारण जनता असायची; मात्र आता स्त्री, पुरुष, मुले, डॉक्टर, इंजिनियर आदी सुशिक्षितांचाही सहभाग मिळू लागल्याचा दावा संघटनेने केला आहे. त्यामुळे पाक सेनेची डोकेदुखी वाढली आहे. आता केवळ आझादी हेच बीएलएने आपले ध्येय ठरविले आहे ते कितपत साध्य होते हे येणारा काळच ठरवेल.
Related
Articles
गतविजेत्या केकेआरवर आरसीबीचा विजय
23 Mar 2025
आवक घटल्याने काकडीचे दर वाढले
23 Mar 2025
स्वदेशी शस्त्रनिर्मितीत देश आघाडीवर ६५ टक्के निर्मिती
26 Mar 2025
सरकारने कष्टकर्यांचा विश्वासघात केला
21 Mar 2025
वक्फ दुरुस्ती विधेयक म्हणजे घटनेवर हल्ला
24 Mar 2025
बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण
23 Mar 2025
गतविजेत्या केकेआरवर आरसीबीचा विजय
23 Mar 2025
आवक घटल्याने काकडीचे दर वाढले
23 Mar 2025
स्वदेशी शस्त्रनिर्मितीत देश आघाडीवर ६५ टक्के निर्मिती
26 Mar 2025
सरकारने कष्टकर्यांचा विश्वासघात केला
21 Mar 2025
वक्फ दुरुस्ती विधेयक म्हणजे घटनेवर हल्ला
24 Mar 2025
बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण
23 Mar 2025
गतविजेत्या केकेआरवर आरसीबीचा विजय
23 Mar 2025
आवक घटल्याने काकडीचे दर वाढले
23 Mar 2025
स्वदेशी शस्त्रनिर्मितीत देश आघाडीवर ६५ टक्के निर्मिती
26 Mar 2025
सरकारने कष्टकर्यांचा विश्वासघात केला
21 Mar 2025
वक्फ दुरुस्ती विधेयक म्हणजे घटनेवर हल्ला
24 Mar 2025
बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण
23 Mar 2025
गतविजेत्या केकेआरवर आरसीबीचा विजय
23 Mar 2025
आवक घटल्याने काकडीचे दर वाढले
23 Mar 2025
स्वदेशी शस्त्रनिर्मितीत देश आघाडीवर ६५ टक्के निर्मिती
26 Mar 2025
सरकारने कष्टकर्यांचा विश्वासघात केला
21 Mar 2025
वक्फ दुरुस्ती विधेयक म्हणजे घटनेवर हल्ला
24 Mar 2025
बिहारच्या हिंदी भाषक विद्यार्थ्यांना पंजाबमध्ये मारहाण
23 Mar 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
शिमला मिरची, शेवगा, फ्लॉवर, भुईमुग शेंगाच्या दरात घट
2
बेकायदा गॅसची विक्री करणार्यास अटक
3
राज्यात चार दिवस पाऊस पडणार
4
पृथ्वीची धाडसी लेक (अग्रलेख)
5
बनावट मतदानास आळा (अग्रलेख)
6
युपीआय व्यवहारावर कर?