ग्रीन कार्डसाठी अमेरिकन नागरिकाशी विवाह केल्यास तुरुंगवास : ट्रम्प   

वॉशिंग्टन : ग्रीन कार्ड मिळवण्यासाठी अमेरिकन नागरिकांशी विवाह करून त्यांची फसवणूक केल्यास तुरुंगवासाची शिक्षा भोगावी लागेल, असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्थलांतरितांना दिला आहे. अवैध स्थलांतरितांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ट्रम्प वेगवेगळे डावपेच अवलंबत आहेत. अमेरिकन नागरिकांशी विवाह करणार्‍या स्थलांतरितांवरही ट्रम्प यांचे लक्ष आहे. यूएस सिटिझनशिप अँड इमिग्रेशन सर्व्हिसेसने हा एक गंभीर गुन्हा ठरवला आहे. इमिग्रेशन कायद्यातील कोणत्याही तरतुदी टाळण्यासाठी जाणूनबुजून लग्न करणार्‍या व्यक्तीला विवाह फसवणूक कायद्याच्या कलम १३२५(सी) अंतर्गत पाच वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. 
 
अमेरिकन महिलांशी विवाहाचा बहाणा करून स्थलांतरित बक्कळ पैसा कमवत आहेत. अमेरिकन नागरिकत्व मिळवण्यासाठी परदेशी नागरिक अमेरिकन मुलींशी लग्न करतात आणि नंतर घटस्फोट घेतात अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत. ट्रम्प प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, आता जर कोणत्याही परदेशी व्यक्तीने असे केले तर त्याला करोडो रुपयांपर्यंत दंड आणि हद्दपारीला सामोरे जावे लागू शकते.अमेरिकन सरकारने समाजमाध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, व्हिसा जारी झाल्यानंतर  यू. एस. व्हिसा तपासणी थांबत नाही. आम्ही सर्व यूएस कायदे आणि इमिग्रेशन नियमांचे पालन करत असल्याची खात्री करण्यासाठी व्हिसा धारकांची सतत तपासणी करतो. अमेरिकन सरकारच्या नवीन निर्देशांनुसार, ज्या लोकांना अमेरिकेत काम करण्यासाठी आणि राहण्यासाठी व्हिसा मिळाला आहे ते देखील अमेरिकन प्रशासनाच्या रडारवर सतत असतील.

Related Articles