पंतप्रधान मोदी ५ एप्रिलला श्रीलंका दौर्‍यावर   

कोलंबो : पंतप्रधान नरेंद्र मोदी ५ एप्रिलला श्रीलंका दौर्‍यावर जाणार आहेत. श्रीलंकेचे अध्यक्ष अनुरा कुमार दिसनायके यांनी संसदेतील भाषणादरम्यान मोदींच्या दौर्‍याची तारीख जाहीर केली.परराष्ट्र मंत्री विजया हेरथ यांनी गेल्या आठवड्यात घोषणा केली होती की,  अध्यक्ष दिसानायके यांच्या दिल्ली भेटीदरम्यान झालेल्या करारांना अंतिम रूप देण्यासाठी मोदी २०२५ मध्ये कोलंबोला येतील. त्रिंकोमालीच्या पूर्वेकडील बंदर जिल्ह्यातील सामपूर पॉवर प्लांटचे बांधकाम मोदींच्या दौर्‍याच्या वेळीच सुरू होईल. श्रीलंका आणि भारत यांनी त्रिंकोमाली येथे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी गेल्या महिन्यात करार केला होता. श्रीलंका सरकार आणि भारत सरकार यांच्यात ५० मेगावॅट (फेज १) आणि ७० मेगावॅट (फेज २) क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प त्रिंकोमाली येथे उभारण्यासाठी करार झाला आहे. 

Related Articles