बिहारमध्ये चकमकीत तीन गुंड ठार   

अरारिया : बिहारमध्ये खुनाच्या आणि दरोड्याच्या गुन्ह्यांत पोलिसांना हवे असणारे तीन गुंंड शनिवारी चकमकीत ठार झाले आहे. राज्याच्या अरारिया जिल्ह्यात पोलिसांनी कारवाई केली होती. नरपतगंज परिसरात काल पहाटे चार वाजण्याच्या सुमारास गुंडांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक गेले होते. तेव्हा चकमक उडाली. त्यात गुंड ठार झाले असून चार पोलिस जखमी झाले, अशी माहिती अतिरिक्त पोलिस महासंचालक कुंदन कृष्ण यांनी दिली. सर्व गुंडांची नावे उघड झाली आहेत. भोजपूर आणि पुर्णिया जिल्ह्यात विविध सराफी दुकाने त्यांनी लुटली होती. त्यांच्या मागावर पोलिस होते. 
 
भोजपूर जिल्ह्यातील अरा परिसरात त्यांनी १० मार्च रोजी सराफी दुकानांवर दरोडा टाकला होता. बिहार पोलिसांच्या विशेष कृती दल त्यांच्या मार्गावर कित्येक दिवसांपासून होते. गुंड वाराणसी मिर्झापूर, ढेरी, मिर्झापूर ते अरारिया येथे लपून राहिले होते. अखेर त्यांना नरपतगंज परिसरात पोलिसांनी वेढा घालून पकडले. पळून जाण्याचा ते प्रयत्न करत होते. तेव्हा त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांच्या प्रत्युत्तरात ते मारले गेले आहेत. त्यापैकीं एका गुंडाला पकडून देणार्‍यास ३ लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते. त्यानेच पोलिसांच्या गराड्यातून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यावर खून, लूटमार, अपहरण, दरोडे टाकणे आणि सराफी दुकाने लुटण्याचे गुन्हे दाखल होते. 

Related Articles