हा कचरा अलाहाबाद न्यायालयात नको..   

यशवंत वर्मांना बार असोसिएशनचा विरोध 

नवी दिल्ली : ..हा कचरा अलाहाबादमध्ये नको, अशा शब्दात न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या अलाहाबादमधील नियुक्तीला बार असोसिएशनने शनिवारी तीव्र विरोध दर्शवला. दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या घरी कोट्यवधीचे घबाड सापडले. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या कॉलेजियमने न्यायमूर्ती वर्मा यांची अलाहाबाद उच्च न्यायालयात परत बदली केली. मात्र, बंगल्यातून रोख रक्कम सापडल्याच्या बातम्या आणि त्यांची बदली याचा काहीही संबंध नसल्याचे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निवेदनात स्पष्ट केले.
  
 दरम्यान, या प्रकरणावर बार असोसिएशनने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. असोसिएशनने निवेदन जारी करून म्हटले आहे की, सर्वोच्च न्यायालयाने न्यायमूर्ती वर्मा यांची भ्रष्टाचारात गुंतल्याच्या कारणावरून अलाहाबादला बदली केली. ही शिक्षा आहे की बक्षीस? अलाहाबाद उच्च न्यायालय हे डस्टबिन आहे का?बार असोसिएशनचे अध्यक्ष अनिल तिवारी म्हणाले, १५ लाख रुपये सर्वसामान्य कर्मचार्‍याच्या घरी सापडल्यास त्याला तुरुंगात पाठवले जाते. न्यायमूर्ती वर्मा यांनी राजीनामा द्यावा. जर ते येथे सामील झाले तर आम्ही त्यांचे स्वागत करू देणार नाही. न्यायालयात काम होणार नाही.

Related Articles