आदित्यचे नाव घेऊ नये, यासाठी उद्धव यांचा दोनदा फोन   

राणे यांचा गौप्यस्फोट
 
मुंबई, (प्रतिनिधी) : दिशा सालियन प्रकरणात आदित्यचे नाव घेऊ नका म्हणून स्वतः उद्धव ठाकरेंनी आपल्याला दोन वेळा केला होता, असा दावा माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेत नारायण राणे यांनी केला. अभिनेता सुशांतसिंह राजपूतची व्यवस्थापक दिशा सालियनच्या मृत्यू प्रकरणात मुंबई  पोलिसांची भूमिका संशयास्पद  असल्याचा आरोप करताना,  सालियन प्रकरणात पोलिसांनी पुरावे असूनही तेव्हा कारवाई का केली नाही? असा सवाल करत राणे यांनी गृह खात्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
 
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी फेरचौकशी व्हावी, या मागणीसाठी दिशाचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेचे पडसाद विधिमंडळ अधिवेशनात उमटून सत्ताधारी पक्षाकडून या प्रकरणी आदित्य ठाकरे यांना अटक करण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना पोलिसांना हाताशी धरत दिशा सालियान मृत्यू प्रकरण दडपण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप केला. 

Related Articles