प्रशांत कोरटकर भारताबाहेर पळाल्याचा दावा   

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याचा तसेच प्रसिद्ध इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांना फोनवरुन धमकी दिल्याचा आरोप असलेला प्रशांत कोरटकर हा भारताबाहेर पसार झाल्याचा दावा करण्यात येत आहे. मुंबई उच्च न्यायालयात दिलासा न मिळाल्याने कोरटकर दुबईला पळून गेल्याचे सांगितले जात आहे. यावरच आता इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
      
यासंदर्भात कोल्हापुरात प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना इंद्रजीत सावंत म्हणाले, अशा प्रवृत्तीच्या माणसाला सुरुवातीलाच अटक व्हायला हवी होती. या प्रकरणाला एक महिना पूर्ण होत आला. कायद्याचे संरक्षण नसताना आणि गुन्हे दाखल असताना देखील असा चिल्लर माणूस पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळून जातो, हे तर गृहखात्याचे अपयश आहे. शिवप्रेमी गृहमंत्र्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज जिजाऊ मासाहेबांचा जो अपमान करेल तो सुटता कामा नये, कोणतीतरी यंत्रणा आहे. ही या व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे,अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

Related Articles