आवक घटल्याने काकडीचे दर वाढले   

पुणे : वाढलेल्या उन्हामुळे थंडावा देणार्‍या काकडीला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत काकडीची आवक होत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळेच काकडीच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात ४०  ते ५० रूपये किलोने काकडीची विक्री केली जात आहे. 
 
उन्हामुळे सर्वत्र पाण्याचा प्रश्न जाणवत आहे. काही भागात पीकांना पाणी कमी पडत आहे. त्यामुळे काकडीची आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात दर वाढले आहेत. आवक न वाढल्यास दरात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यापारी वर्तवित आहेत. काकडीसह गाजर, बीटलाही मागणी वाढली आहे. दिवसेंदिवस वाढत असलेल्या ऊन्हामुळे ही मागणक्ष कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. उन्हाळ्यात काकडी खाणे आरोग्यासाठी उपयुक्त समजले जाते. तीव्र उन्हापासून बचाव करण्यासाठी उसाचा रस, टरबूज, शीतपेये, लिंबासह स्वादिष्ट व उष्णतेचा दाह कमी करणार्‍या काकडीच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. मात्र उन्हामुळे आवक घटल्याने काकडी सध्या बाजारात भाव खाऊन जात आहे. काकडीत ९५ टक्के पाणी; डिहायड्रेशन रोखते पाण्यासह फायबर, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशियमसारखी पोषक द्रव्यांसह व्हिटॅमिन बी मुबलक प्रमाणात असते. उन्हाच्या कडाक्यात काकडी खाणे फायदेशीर असते. काकडीत ९५ टक्के पाणी; याशिवाय मधुमेहासाठीही काकडी खाणे चांगले असते.
 
ऊन्हामुळे मागणीत वाढ
 
वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर बाजारात काकड्यांची आवक मार्चपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाढली होती; पण सध्या आवक घटली आहे. त्यामुळे सध्या काकडीला मागणी असून भाव ही तेजीत आहेत. तरी ही याकाळात काकडीच्या मागणीत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे.
- अशोक गावड, भाजी विक्रेते.

Related Articles