कांदा निर्यातीच्या करामध्ये २० टक्के कपातीचा निर्णय   

नवी दिल्ली : कांद्याचा निर्यात कर मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारने शनिवारी घेतला आहे. त्या अंतर्गत २० टक्के कर मागे घेण्याची घोषणा केली आहे .या नियमांची अंमलबजावणी १ एप्रिलपासून लागू होणार आहे.ग्राहक व्यवहार विभागाशी याबाबतच चर्चा झाल्यानंतर महसूल विभागाने याबाबतची अधिसूचना काढली आहे. कांदा उत्पादकांना आणि ग्राहकांना किंमतीबाबत दिलासा देण्यासाठी २० टक्के कर मागे घेत असल्याचे सांगितले.   गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने निर्यातीवर कर लागू केला होता. निर्यातीवरील बंधनानंतरही १८ मार्च अखेर १० लाख ७० हजार टन कांद्याची निर्यात झाली आहे. 

Related Articles